मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांच्या लग्नापासून ते त्यांच्या घटस्फोटापर्यंतच्या बातम्या खूप चर्चेत असतात. सैफ-अमृता यांचं 1991 मध्ये लग्न झालं. पण त्यांचं लग्न टिकू शकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. सैफ अली खानसोबत लग्न करण्यापूर्वी अमृता सिंगच्या आयुष्यात आणखी कोणी होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता सिंगचं पहिलं प्रेम प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांच्यावर होतं. एकेकाळी इंडस्ट्रीत अमृता आणि रवी शास्त्री यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या होत्या.



असे म्हटले जाते की रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांना लग्न करायचं होतं, पण क्रिकेटरच्या एका अटीमुळे गोष्टी सुरळीत होऊ शकल्या नाहीत. रवी शास्त्रींना अमृता सिंगने लग्नानंतर चित्रपटात काम करणे थांबवावे अशी इच्छा होती पण अमृताने ते मान्य केले नाही.



मात्र, रवी शास्त्रीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमृता सिंगच्या आयुष्यात अभिनेता विनोद खन्ना यांची एन्ट्री झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनोद खन्ना आणि अमृता सिंग यांच्यात 1989 मध्ये आलेल्या 'बंटवारा' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जवळीक वाढली होती.


मात्र, अमृता सिंगच्या आईला विनोद खन्ना यांनी आपल्या मुलीशी लग्न करावे असे वाटत नव्हते, यामागे दोन मोठी कारणे होती. पहिले म्हणजे विनोदचे आधीच लग्न झालेले होते आणि दुसरे म्हणजे ते वयाने अमृता सिंगपेक्षा खूप मोठे होते.


त्याचा परिणाम असा झाला की विनोद खन्ना आणि अमृता सिंग यांची जोडीही तुटली, अशी देखील माहिती समोर आली होती. यानंतर अभिनेता सैफ अली खान अमृता सिंगच्या आयुष्यात आला आणि 1991 मध्ये अमृता सिंगने सैफसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.


पण अमृता आणि सैफचं नात देखील कालांतराने संपल. सैफ आणि अमृताला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. अमृता आज सिंगल मदर असताना सैफने 2012 मध्ये करीना कपूरशी लग्न केले.