Samantha नव्हे, तर ही प्रसिद्ध अभिनेत्री Naga Chaitanya चं पहिलं प्रेम
अविवाहित असताना त्याचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे.
मुंबई : दक्षिणेचा सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आणि जबरदस्त अभिनेता नागा चैतन्य घटस्फोटानंतर अविवाहित असताना त्याचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे.
35 वर्षीय अभिनेता नागा 23 नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस साजरा करत आहे, अर्थातच सामंथा आणि नागा दोघांनीही हा घटस्फोट स्वीकारून पुढे जाण्याचे बोलले होते आणि दोघेही कलाकार त्यांच्या आयुष्यात स्वतःला व्यस्त ठेवत आहेत.
पण नागा एक खाजगी व्यक्तिमत्व आहे, सोशल मीडियावर तो जास्त सक्रिय असतो. त्यामुळेच सामंथापासून वेगळे झाल्यानंतर नागाला धक्का बसला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
बरं, कुणाचं हृदय प्रेमात जोडलं तर कुणाचं तुटतं, याआधीही नागाचे हृदय तुटले होते. रिपोर्ट्सनुसार, नागा 2013 मध्ये कमल हसनची मुलगी श्रुती हसनवर प्रेम करत होते. दोन्ही कलाकारांमध्ये चांगलं बॉण्डिंग होतं. 2013 च्या साऊथ इंडियन फिल्मफेअर अवॉर्ड्स नाईटमध्ये दोघांमधील जवळीक खूप काही सांगून गेली होती.
असेही म्हटले जाते की नागा चैतन्यला श्रुतीशी लग्न करायचे होते. मात्र श्रुतीची बहीण अक्षरा हसन हिच्यामुळे झालेल्या गैरसमजामुळे दोघांमधील संवाद थांबला. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर श्रुती, नागा आणि अक्षरा एकत्र एका फंक्शनला गेल्या होत्या.
श्रुतीला तिथे परफॉर्म करायचे होते पण बाकी दोघांना कुठेतरी जायचे होते. श्रुतीने नागाला अक्षराला सोडण्यास सांगितले पण वेळेच्या समस्येमुळे नागाला एकटच निघावं लागलं. पुढे हेच दोघांमध्ये वादाचे कारण बनले.
2015 मध्ये, जेव्हा श्रुतीने नागाच्या वाढदिवसानिमित्त एक सेल्फी शेअर केला तेव्हा चाहत्यांना वाटले की कदाचित दोघांचे पॅचअप झाले असेल, पण तसे काही नव्हते. श्रुती आणि नागा यांनी 2016 मध्ये 'प्रेमम'मध्ये एकत्र काम केले होते. यानंतर नागा सामंथाला भेटला, दोघांनीही आपली तुटलेली ह्रदये जुळवण्यासाठी मैत्रीचा मार्ग निवडला आणि दुःख वाटून घेताना दोघे कधी प्रेमात पडले, हे त्यांना कळलेही नाही. जानेवारी 2017 मध्ये नागा आणि सामंथा यांनी एकमेकांशी एंगेज केले, त्यानंतर ऑक्टोबर 2017 मध्ये दोघांनीही लग्नगाठ बांधली.