मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समंथा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. समांथाला मायोसिटिस या आजाराचं निदान झाल्याचं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत तिनं सांगितलं होतं. यात आता समांथाचा आगामी तेलगू थ्रिलर सिनेमा (samantha ruth prabhu upcoming movies) 'यशोदा' (Yashoda) लवकरच प्रदर्शित होणार आहे. या दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिनं फक्त एक दिवस बाकी आहे असं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी समांथानं Fingers Cross करत फोटो शेअर केला आहे.  खूप जास्त चिंता आणि त्याहून जास्त उत्साही! फक्त एक दिवस बाकी आहे. यशोदाला खूप खूप शुभेच्छा. माझे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि संपूर्ण क्रू यांना शुभेच्छा कारण माझ्यासारखंच ते उद्या मिळणाऱ्या तुमच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा करत आहेत. All fingers and toes crossed, असे कॅप्शन दिले आहे. 


हेही वाचा : Rapper Drake ने लता मंगेशकरांच्या 'दीदी तेरा देवर दीवाना' गाण्याचं बनवलं रीमिक्स, Video Viral



‘यशोदा’ हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा पाचही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर तिचे ‘शंकुतलम’ आणि ‘खुशी’ हे बिगबजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.


समांथाला झालेला मायोसिटिस आजार म्हणजे नेमक काय?


मायोसिटिस ही एक स्वयंप्रतिकार स्थिती मानली जाते ज्यामध्ये शरीराच्या स्नायूंवर गंभीर परिणाम होतो. त्याच्या सामान्य लक्षणांमध्ये स्नायू दुखणे, थकवा येणे, खाणे-पिणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश होतो. पुरुषांपेक्षा महिलांना या आजाराचा धोका जास्त असतो आणि मुलांवरही याचा परिणाम होऊ शकतो.


पाच प्रकारचे मायोसिटिस आणि त्यांची लक्षणे


मायोसिटिसचे पाच प्रकार आहेत: - डर्माटोमायोसिटिस, इन्क्लुजन-बॉडी, जुवेनाईल मायोसिटिस, पॉलीमायोसिटिस आणि टॉक्सिक मायोसिटिस.


1-डर्माटोमायोसिटिसमुळे चेहरा, छाती, मान आणि पाठीवर जांभळ्या-लाल पुरळ उठतात. इतर लक्षणांमध्ये खडबडीत त्वचा, थकवा, स्नायू कमकुवतपणा, स्नायू दुखणे, वजन कमी होणे, अनियमित हृदयाचे ठोके इ.


2-इन्क्लुसिव्ह-बॉडी मायोसिटिस (IBM) स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त प्रभावित करते आणि मुख्यतः 50 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये विकसित होते. त्याच्या लक्षणांमध्ये स्नायू कमकुवत होणे आणि स्नायू दुखणे यांचा समावेश होतो.


3-जुवेनाइल मायोसिटिस (जेएम) मुलांमध्ये होतो. हे मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त आढळते. त्याची लक्षणे लाल-जांभळ्या पुरळ, थकवा, अस्थिर मूड, ओटीपोटात दुखणे, बसलेल्या स्थितीतून उठण्यास त्रास होणे, स्नायू कमकुवत होणे, सांधेदुखी, ताप इ.


4-पॉलीमायोसिटिसची सुरुवात स्नायूंच्या कमकुवतपणासारख्या लक्षणांनी होते. सर्व स्नायूंवर प्रथम या रोगाचा हल्ला होतो. स्नायू कमकुवत होणे आणि दुखणे, गिळताना समस्या, संतुलनाची समस्या, कोरडा खोकला, हातावरची त्वचा जाड होणे, धाप लागणे, वजन कमी होणे आणि ताप येणे ही त्याची लक्षणे आहेत.


5-पाचव्या प्रकाराला टॉक्सिक मायोसिटिस म्हणतात. हे निर्धारित औषधे आणि बेकायदेशीर औषधांच्या वापरामुळे होते. स्टॅटिनसारख्या कोलेस्टेरॉलच्या औषधांमुळे असे होते.


मायोसिटिसचा उपचार


मायोसिटिससाठी कोणतेही विशिष्ट औषध नाही. कॉर्टिकोस्टिरॉईड्स नावाच्या औषधांचा एक वर्ग डॉक्टरांनी लिहून दिला आहे. हा एक स्वयंप्रतिकार रोग असल्याने, इम्युनोसप्रेसंट औषधे देखील वापरली जातात. स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी  योगासन आणि व्यायाम करणं फायद्याचं ठरतं.