मुंबई : मनोरजंन विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते अभिषेक चॅटर्जी यांचं निधन झालं आहे. अभिनेते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक चॅटर्जी यांनी प्रोसेनजीत चॅटर्जी आणि संध्या मुखर्जी यांच्यासोबत आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. अभिनेत्याच्या निधनामुळे सिनेजगतात शोककळा पसरली आहे.


कोलकाता येथील बारानगर येथे जन्मलेल्या अभिषेक चॅटर्जी यांनी वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी  जगाचा निरोप घेतला आहे. ही बातमी सर्वांनाच हादरवणारी आहे.



ते बंगाली चित्रपटसृष्टीतील त्या अभिनेत्यांपैकी एक होते, ज्यांना अजून खूप काम करायचे होते आणि लोकांचे मनोरंजन करायचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते जीवन आणि मृत्यूची लढाई लढत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.