मुंबई : कलाविश्वाला हादरा देणारी आणखी एक बातमी नुकतीच समोर आली आहे. बंगाली अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या घरात पुन्हा एकदा नोटांचं घबाड सापडलं आहे. तिच्या बेलघोरिया फ्लॅटमध्ये तब्बल 30 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. तर तब्बल 5 किलो सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. (bengali actress arpita mukherjee house raid crores found at home)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तपासात काही जमिनींचे कागदपत्रही जप्त करण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अर्पिता आणि मंत्री पार्थ चटर्जी यांचा सहभाग असल्याचा आरोप असून, याप्रकरणी चौकशी सुरू आहे. अर्पिताच्या दोन्ही घरात मिळून आतापर्यंत 51 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदर घोटाळा आणि त्याची व्याप्ती पाहता येत्या काळात आणखी रोकड सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


अर्पिताच्या घरात सापडलेली रोकड इतकी होती, की त्या ठिकाणी नोटा मोजण्याचं यंत्र मागवण्यात आलं. ईडीकडून सदर ऐवज नेण्यासाठी जवळपास 20 ट्रंक मागवण्यात आल्या होत्या. 



रोकड नक्की कुणाची ? 
घोटाळ्यात नाव पुढे आल्यामुळं पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या अडचणी वाढणार आहेत. यापूर्वीच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यातच अर्पितानंही ही सर्व रोकड आपली नसून, चॅटर्जी यांचीच असल्याचा जबाब नोंदवल्यामुळं त्यांच्या भोवती असणारा अडचणींचा विळखा आणखी मजबूत होताना दिसत आहे.