मुंबई : तुम्हाला काय वाटतं की बॉलिवूड स्टार्स फक्त अभिनयातूनच पैसा कमावतात? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही या भ्रमात राहू नका. आपले काही स्टार्स असे आहेत जे आपल्या बिझनेस कौशल्यासाठी अतिशय लोकप्रिय आहेत. जाणून घेऊया वेगवेगळे स्टार्स 'एक्स्ट्रा कमाई' साठी नेमकं काय करतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सुष्मिता सेन - सुष्मिता आता अभिनयात एवढी सक्रिय नाही आहे. मिस युनिवर्स सुष्मिता सेन दुबईमध्ये एक ज्वेलरी लाइनच्या व्यवसायात मालकिण आहे. यासोबतच तिची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तंत्र इंटरटेनमेंट देखील आहे. ही कंपनी तिने २००५ साली लाँच केली आहे. या अगोदर सुष्मिता सेनजवळ 'बंगाली मासी का किचन' नावाचं एक रेस्टॉरंट देखील आहे. जे आता बंद करण्यात आलं आहे. 



शिल्पा शेट्टी - आजही ही अभिनेत्री कुणालाही कॉम्प्लेक्स आणेल असा शिल्पाचा फिटनेस आहे. शिल्पाजवळ आता मुंबई IOSIS स्पा चेन आहे. ज्यामधून तिला चांगल्याप्रमाणात कमाई मिळत आहे.



शाहरूख खान - बॉलिवूडचा किंग खान अभिनयाबरोबर स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊस सांभाळतो. या कंपनीचं नाव रेड चिलीज आहे. या प्रोडक्शन हाऊसमधून शाहरूख खानने डिअर जिंदगी आणि माय नेम इज खान सारखे हिट्स सिनेमे दिले. यासोबतच शाहरूख खान आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा मालक देखील आहे. त्याचप्रमाणे शाहरूख खानकडे कुटुंबाचं मनोरंजन करणारी इंटरनॅशनल चेन असलेली KidZania या भारतीय फ्राँचाइजीचा मालकी हक्क देखील आहे. 



अजय देवगन - अभिनयाच्या क्षेत्रात असलेल्या अजय देवगनने गुजरातच्या चारणका सोलर प्रोजेक्टमध्ये इन्वेस्ट केलं आहे. यामध्ये दुसऱ्या कंपनी म्हणजे रोहा ग्रुप, कुमार मंगत यासारख्या अनेक कंपन्या पैसा लावत आहे. अजयचं असं म्हणणं आहे की, सोलर पावर इंडस्ट्रीचं भविष्य चांगलं आहे. 



ऐश्वर्या राय बच्चन - अभिनेता अभिषेक बच्चन दोन स्पोर्ट्स फ्राँचाइजीचा मालक आहे. एक प्रो कबड्डी लीगमध्ये आनंद महिंद्रा, चारू शर्मा प्रमोटेड जयपुर पिंक पँथर्स आणि दुसरीकडे इंडियन सुपर लीगची चेन्नियन FC आहे. ज्यामुळे हल्ली अभिषेक आपल्याला सिनेमात कमी दिसतो.