COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सुप्रसिद्ध इराणी दिग्दर्शक माजिद मजीदी यांचं नाव सर्वांनाच सुपरीचित आहे. 'बियॉन्ड द क्लाउड्स' हा सिनेमा मागील वर्षी लंडन फिल्म फेस्टीवलमध्ये दाखवण्यात आला.  त्यावेळी तेथे उपस्थित पाहुण्यांनी कलाकारांनी, क्रिटिक्सने चित्रपटाची स्क्रिनिंग संपताच, सिनेमाचं कौतुक केलं. माजिद यांनी हा सिनेमा बनवण्याचं स्वप्न तेव्हा हाती घेतलं, जेव्हा ते मुंबई फिल्म फेस्टीवलला आले होते. यानंतर त्यांनी सर्वात आधी संगीतकार एआर रहमान यांच्याशी संपर्क साधला. याआधीच माजिद मजीदी आपल्या डॉक्युमेंट्रीसह जवळजवळ २० पेक्षा जास्त चित्रपटांमुळे मीडियाच्या चर्चेत राहिले आहेत.


लंडनमध्ये या सिनेमाने नाव कमवलं


लंडनमध्ये 'बियॉन्ड द क्लाउड्स' स्क्रिनिंग झाल्यानंतर, इंटरनॅशनल मीडियात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला, यानंतर भारतीय प्रेक्षकांमध्ये देखील या सिनेमाविषयी उत्कंठा वाढली आहे. तसं पाहिलं तर या सिनेमाला सुरूवातीला स्क्रिन मिळण्यासाठी त्रास निश्चित झालेला आहे.


चित्रपटाची कहाणी 


चित्रपटाची कहाणी आमिर (ईशान खट्टर), आणि त्याची मोठी बहिण तारा (मालविका मोहनन) वर आधारीत आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आमिर बहिणीच्या घरी राहू लागला. पण ताराचा दारूडा नवरा नेहमी तारासह, आमिरला रोज मारत होता. अखेर १३ वर्षाचा आमिर आपल्या बहिणीचं घर सोडून पळून जातो. पण  नियतीच्या मनात काही तरी वेगळंच होतं. काही दिवसानंतर तारा आणि आमिर पुन्हा एकदा भेटले, पण आता तारा आणि आमिरचं जीवन, अशा अनेक कठीण गोष्टींमधून गेलं होतं की, त्यात काहीच सुरळीत सुरू नव्हतं. ताराचा भाऊ आमिर आता वाईट संगतीत पैशांसाठी काहीही करायला तयार होता, पैशांसाठी तो वाट्टेल ते करण्यास तयार असे. धोबी घाटावरील जवळ जवळ ५० वर्षांचा अर्शी (गौतम घोष) तारावर नेहमी वाईट नजर ठेवत होता. जेव्हा अर्शी तारासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अर्शीला तारा मोठ्या दगडाने मारते. अर्शीवर जीवघेणा हल्ला केला म्हणून ताराला जेलमध्ये जावं लागतं. येथूनच या कहाणीत एक मोठा बदल होतो.


अॅक्टींग 


अॅक्टिंगचा विचार केला, तर भाऊ म्हणून ईशान खट्टरमध्ये यंग अॅक्टर दिसून येतो, जो सर्व भूमिकांमध्ये व्यवस्थित बसतो. सुरूवातीपासून शेवटपर्यंत ईशानची अॅक्टींग छान झाली आहे. ईशानची बहिणी साऊथमधील अभिनेत्री मालविका मोहननने देखील, आपली भूमिका जिवंत केली आहे. तसा प्रेक्षकांना हा सिनेमा नव्ववदच्या दशकात रिलीज झालेल्या 'चिल्ड्रन ऑफ हेवन' सारखा वाटू शकतो. 


ईशानने पहिल्याच सिनेमाच्या अॅक्टिंगमध्ये दाखवून दिलं आहे की, तो पुढील काळातील स्टार आहे. चित्रपटात तनिष्ठा चॅटर्जीसाठी जास्त स्कोप नव्हता.


कॅमेरा


 चित्रपटाचं शुटिंग मुंबईच्या काही झोपडपट्टीच्या भागात झालं आहे. येथे कॅमेरा मन अनिल मेहता याचं विशेष कौतुक करावं लागेल. अनिल मेहता यांनी स्लम कॉलनीत ज्या पद्धतीने शूट केलेलं आहे, की ते पाहावसंच वाटतं. एआर रहमान यांचं संगीतही त्यांच्या प्रतिभेनुसार आहे. आपल्या नजरेत बियॉन्ड द क्लाउडस एक पाहिलाच पाहिजे असा सिनेमा आहे. जर असा चित्रपट तुमच्या घरापासून लांब असलेल्या थिएटरमध्ये लागला असेल तरी जरूर पाहा. पण एक लक्षात ठेवा जर अॅक्शन, रोमान्स, हॉट सीन्सचे तुम्ही शौकीन असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही.