लग्नात खर्च झालाय म्हणून हनिमून टाळताय? ही घ्या 7 स्वस्तात मस्त ठिकाणांची यादी

budget Honeymoon places in india : हनिमूनसाठी खिशाला परवडेल अशाच ठिकाणी जायचंय? पाहा अशा ठिकाणांची यादी, जिथं खर्चही अवाक्यात असेल आणि फिरण्याचा आनंदही मिळेल.   

Nov 18, 2024, 11:10 AM IST

budget Honeymoon places in india : लग्नानंतर हनिमूनसाठी जाण्याला अनेकांचीच पसंती असते. पण, खर्चाचा डोंगर इथंही अडचणी निर्माण करताना दिसतो. 

 

1/8

budget Honeymoon places in india

budget Honeymoon places in india

budget Honeymoon places in india : लग्नानंतर खर्च फार झालाय, हनिमूनसाठी एखादं स्वस्तात मस्त ठिकाण बघताय? ही घ्या यादी....   

2/8

अंदमान निकोबार

budget Honeymoon places in india

अंदमान निकोबार- अथांग समुद्राच्या निळ्याशार पाण्याकडे पाहत खास क्षण व्यतीत करण्याची इच्छा असणाऱ्या जोडप्यांसाठी अंदमान आणि निकोबार बेटं हा एक उत्तम आणि किफायतशीर पर्याय. 

3/8

अॅलेप्पी

budget Honeymoon places in india

अॅलेप्पी - हनिमूनच्या निमित्तानं एखाद्या नव्या ठिकाणी जायची इच्छा असेल, तर अॅलेप्पी हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम ठरेल. इथं बॅकवॉटर्समध्ये हाऊसबोटमधून मारलेला फेरफटका तुम्हाला आनंद देऊ जाईल. 

4/8

शिमला

budget Honeymoon places in india

शिमला- पर्वतांची राणी, अशी ओळख असणाऱ्या हिमाचल प्रदेशातील शिमला या ठिकाणी तुम्ही हनिमूनसाठी येऊ शकता. मुख्य प्रवाहात असणाऱ्या या ठिकाणी किमान खर्चात तुम्ही मुक्कामाचा आनंद घेऊ शकता. 

5/8

गोवा

budget Honeymoon places in india

गोवा - एका वेगळ्याच आणि स्वच्छंद विश्वास आल्याची अनुभूती देणारं आणि खर्चाचा ताण न देणारं एक ठिकाण म्हणजे गोवा. दक्षिण आणि उत्तर गोवा अशा दोन भिन्न प्रकारच्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. 

6/8

मुन्नार

budget Honeymoon places in india

मुन्नार - निसर्गाच्या सानिध्ध्यात रमणाऱ्या जोडप्यांसाठी मुन्नार हे एक उत्तम ठिकाण. चहाचे मळे, हवेतील गारवा आणि बोट राईडपासून इतर कैक गोष्टी इथं येताच पर्यटकांना आनंद देऊन जातात. 

7/8

उदयपूर

budget Honeymoon places in india

उदयपूर - तलावांचं शहर अशी ओळख असणाऱ्या उदयपूरमध्ये राजेशाही थाटात तुम्ही मनसोक्त सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता. येथील खाद्यसंस्कृती तुमच्या सुट्ट्यांना चार चाँद लावेल. 

8/8

दार्जिलिंग

budget Honeymoon places in india

दार्जिलिंग - डोंगररांगा, नजर जाईल तिथवर दिसणारा निसर्ग आणि चहाच्या मळ्यांची शिस्तबद्ध शेती इथं येणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेईल.