`भाभी जी..` मधील अनिता भाभीने शेअर केला आपल्या बाळाचा फोटो
पाहा बाळाची पहिली झलक
मुंबई : टीव्हीमधील लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर है' मधील अनिता भाभी म्हणजे सौम्या टंडन हिच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. सौम्या आई झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे. सौम्याने आपल्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली असून आता तिने बाळाचा फोटो देखील सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी शुटिंग पूर्ण करून सौम्या गरोदरपणाच्या सुटीवर होती. तिने आपला हा काळ खूप छान घालवला. याबाबत तिने फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. सोशल मीडियावर या काळात सौम्या खूप ऍक्टिव होती.आपल्या प्री मॅटर्निटीचे फोटो देखील सौम्याने शेअर केले होते.
सौम्याने आपल्या मुलाचा फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, आमचा आनंद... हा फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. सौम्या आणि तिचा नवरा सौरभ एकमेकांना अगदी कॉलेजच्या दिवसांपासून ओळखतात. सौरभने सौम्याला कायमच सपोर्ट केला आहे. सौम्या सुरूवातीच्या काळात मुंबईत बँकेत काम करत होती. तेव्हा तिने अभिनयाला सुरूवात केली नव्हती तेव्हापासून सौरभ सौम्यासोबत आहे. वडिलांच्या निधनानंतर सौरभने सौम्याला खूप आधार दिला.
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात आई होणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. तिच्या जीवनाला आई या भावनेने खरा अर्थ येतो. काही महिन्यांपूर्वी अनिता भाभी म्हणजे सौम्या आई होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. तिने तिच्या सोशल मीडियावर योगा करतानाचे व्हिडिओ शेअर केले होते.
यानंतर प्रेक्षकांना वाटलं होतं की, सौम्या मालिका सोडून जाईल आणि तिच्या जागी कुणी दुसरी अभिनेत्री येईल पण दिग्दर्शकाने ही गोष्ट नाकारली. या मालिकेत अनिताची भूमिका फक्त सौम्या करेल याची जागा कुणी दुसरी व्यक्ती घेणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. सौम्या अतिशय प्रोफेशनल असून सुट्टीवर जाण्याअगोदर तिने सतत काम केलं आहे. याचा विचार केला जाईल असं ही स्पष्ट झालं होतं