भाडीपाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
मराठी वेब मालिकेतील अग्रगण्य असलेलं `भाडीपा` या युट्यूब चॅनलने एक नवा व्हिडिओ अपलोड केला आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची धूम असताना नेमकं घरात काय वातावरण असतं हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओत केला आहे.
मुंबई : मराठी वेब मालिकेतील अग्रगण्य असलेलं 'भाडीपा' या युट्यूब चॅनलने एक नवा व्हिडिओ अपलोड केला आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची धूम असताना नेमकं घरात काय वातावरण असतं हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओत केला आहे.
गणेशोत्सवात अनेक नवनवीन शास्त्र आणि पद्धती समोर येत असतात. आणि यावर का करायचं? असा सवाल केल्यास ते शास्त्र आहे आणि आपण करतो अशी अनेक उत्तर देऊन गप्प गेलं जातं. जसं की बाप्पा आणताना डोक्यावर टोपी घालावी? गणपती आणताना फक्त कुर्ता घालावा? गणेशोत्सवाच्या काळाता दाढी वाढवू नये? अशा अनेक गोष्टींवर बंधन येत असतात.
गणपती आणताना फक्त कुर्ताच झालावा?
गणपतीच्या फुलांचा वास घ्यायचा नसतो?
गणेशोत्सवात दाढी वाढवू नये?
यंदाचा देखावा नेमका कसा करावा?
तुम्ही यंदाही गेल्यावर्षीचाच मखर वापरला आहे का?
तुम्ही दुर्वा बाप्पाच्या सोंडेत ठेवता का?
बाप्पाचा नैवेद्य तुम्हाला चाखू ही देत नाही का?
आईचं शास्त्र तुम्हाला माहित आहे का?
यासारखे अनेक प्रश्न या १२ दिवसांत आपल्या कानावर पडतील? आणि प्रत्येक घरातलं हे चित्रण या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. अलोक राजवाडे आणि रेणुका दाफतारदार हे दोघं आपल्यासमोर हे चित्र उभं करतात.