मुंबई : 'मैने प्यार किया' या चित्रपटातून सर्वांच्या मनावर आपली छाप सोडणारी अभिनेत्री भाग्यश्री आजकाल टीव्ही पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. स्मार्ट कपलमधून सर्वांचं लाडकं कपल बनलेलं हिमालय आणि भाग्यश्री ही जोडी चाहत्यांच्या नेहमी चर्चेत असते. नुकताच भाग्यश्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे कपल खूपच रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाग्यश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्याचबरोबर, अलीकडेच तिने तिच्या पतीसोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पती हिमालयासोबत डान्स करताना दिसत आहे. लाइट कलरच्या साडीमध्ये भाग्यश्री खूपच सुंदर दिसत आहे. पिया ओ रे पिया या गाण्यावर ही जोडी अतिशय सुंदर पद्धतीने नाचताना दिसत आहे. तिची ही स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, फार सुंदर दिसत आहात. तर दुसऱ्या चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की,  आजही वाटतं पहिलं-पहिलं प्रेम आहे. याआधी हे गाणं अनेकदा ऐकलं आहे. भाग्यश्रीच्या बदन पर सितारे लपेटे हुए. या गाण्यावरील डान्स व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्येही दोघांची स्टाईल पाहण्यासारखी आहे.