अभिनेत्री भाग्यश्रीकडून खंत व्यक्त; म्हणाली, `माझा नवरा सुरुवातीच्या दिवसात मला`...
अभिनेत्री भाग्यश्रीने बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.
मुंबई : 'मैने प्यार किया' या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री भाग्यश्रीने बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. सध्या ती प्रसिद्ध डान्स रिएलिटी शो स्मार्ट जोडीमध्ये दिसत आहे. या शोमध्ये भाग्यश्री तिचा पती हिमालय दासानीसोबत एक स्पर्धक म्हणून दिसत आहे. या शोमध्ये दोघांनाही चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळत आहे. शोमध्ये दररोज त्यांच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित गोष्टी समोर येत असतात. आता अभिनेत्रीने लग्नानंतरचे सासरच्या घरचे सुरुवातीचे दिवस कसे होते हे सांगितले आहे.
खरंतर, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये भाग्यश्री सांगतेय की, सुरुवातीला तिचा नवरा तिच्यावर खूप रागवायचा. शोचा होस्ट मनीष पॉल भाग्यश्रीला विचारतोय की, लग्नानंतर तू घर कसं सांभाळलंस, यावर भाग्यश्री उत्तर देत सांगते की, 'जेवण तर यायचं फक्त रोटी यायची नाही. त्यामुळे तो माझ्यावर नाराज होता आणि म्हणायचा की, तू माझ्या आईसारखा स्वयंपाक करत नाहीस. आधी जेवण द्यायचे ते संपता संपत नाही तर कोणी चहा मागायचं ते संपता-संपत नाही तो पर्यंत कोणी चहा मागायचं.
हे पाहून मला वाटायचं की, बाप रे किती जेवतात हे लोकं '. आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शोमधील तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे. भाग्यश्री आणि हिमालय दासानी स्मार्ट जोडीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांपैकी एक आहेत. दोघांना एका एपिसोडसाठी 10 लाख रुपये मिळतात.
शाळेत झाली पहिली भेट
भाग्यश्री आणि हिमालय दसानी यांची पहिली भेट शाळेत झाली. यानंतर हळूहळू दोघांमधील जवळीकता वाढत गेली. दोघांनीही आपलं नातं लग्नाच्या बंधनात बांधायचं ठरवलं. भाग्यश्रीने 1990 मध्ये हिमालय दसानीशी लग्न केलं.