प्रत्येकाला ठेका धरायला लावणार `फकाट`मधील `भाई भाई` गाणं जिंकतंय प्रेक्षकांची मने
१९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या श्रेयश जाधव दिग्दर्शित `फकाट` या चित्रपटातील `भाई भाई` हे भन्नाट बोल असलेले आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे गाणे हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, जॅाली भाटिया आणि नितेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.
मुंबई : १९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' या चित्रपटातील 'भाई भाई' हे भन्नाट बोल असलेले आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे गाणे हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, जॅाली भाटिया आणि नितेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हटक्या चालीवर आपोआप थिरकायला लावणारे हे गाणे हर्षवर्धन वावरे आणि आदित्य पाटेकर यांनी गायले असून या गाण्याला हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर (ट्रिनिटी ब्रदर्स) यांचे बोल आणि संगीत लाभले आहे. तर या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे.
या गाण्यात हेमंत, सुयोग आणि नितेश एकदम जल्लोषात नाचताना दिसत असून जॉली भाटियाच्या कातिल अदांनी ते घायाळ झाले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुयोगचे नृत्यकौशल्य पाहायला मिळत असून हेमंत आणि नितेशनेही एकदम फकाट डान्स केला आहे. या गाण्यात दिग्दर्शक श्रेयश जाधवचीही झलक पाहायला मिळत आहे. एकंदरच हे उत्स्फूर्त गाणं प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे.
या गाण्याबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, " हे उत्साहाने भरलेले गाणे प्रत्येकाला नाचायला लावणारे आहे. ट्रिनिटी ब्रदर्सने या गाण्याला चारचांद लावले आहेत. या गाण्याचा किस्सा म्हणजे सेटवरचे अनेक जण शूटदरम्यान नाचायचे. इतकी या गाण्याच्या संगीताची ताकद आहे. त्यामुळे चित्रीकरणात विलंब व्हायचा. अखेर शूटच्या दरम्यान कॅमेरासमोर सगळ्यांना ठेका धरायला लावला. तरुणाईला आवडेल असे हे गाणे आहे.
हायली कॉन्फिडेन्शियल धिंगाणा असलेल्या 'फकाट' या चित्रपटात अविनाश नारकर, हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, नितेश चव्हाण, रसिका सुनील, अनुजा साठे, किरण गायकवाड, कबीर दुहान सिंग आणि महेश जाधव यांनी प्रमुख भूमिका असून वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहात लवकरच प्रदर्शित होणार आहे.