Bhai Dooj Special: नात्याने भाऊ- बहीण आहेत हे सेलिब्रिटी; नावं वाचून विश्वासच बसणार नाही
हिंदी सेलिब्रिटी वर्तुळातही आज बऱ्याच सेलिब्रिटी भाऊ-बहिणीच्या जोड्या हा सण त्यांच्या अंदाजात साजरा करत आहेत. पण, यामध्ये काही जोड्या अशा आहेत की, ज्यांची नावं वाचून तुम्हाला खरंच वाटणार नाही की ते रिअल लाईफ Siblings आहेत.
Celebrity Siblings: आज भाऊबीज (Bhai Dooj 2022); भाऊ- बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा असा हा दिवस. सर्वत्र हा दिवस अतिशय धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. अगदी कलाविश्वही याला अपवाद नाही. हिंदी सेलिब्रिटी वर्तुळातही आज बऱ्याच सेलिब्रिटी भाऊ-बहिणीच्या जोड्या हा सण त्यांच्या अंदाजात साजरा करत आहेत. पण, यामध्ये काही जोड्या अशा आहेत की, ज्यांची नावं वाचून तुम्हाला खरंच वाटणार नाही की ते रिअल लाईफ Siblings आहेत.
अधिक वाचा : होणाऱ्या सासूबाईंसमोरच आमिरच्या लेकिचा Boyfriend सोबत Romance; पाहा Photos
Ridhi Dogra - Akshay Dogra: रिद्धी डोगरा टेलिव्हिजन विश्वातील एक सुप्रसिद्ध चेहरा आहे. तिचा भाऊ, अक्षय डोगरासुद्धा प्रसिद्धीत काही मागे नाही. अक्षयनंही बहिणीप्रमाणेच TV वर्तुळात कमाल नाव मिळवलं.
Mihika Verma - Mishkat Varma: मिहिका आणि मिशकत वर्मा हे दोघंही भावंड आहेत. बऱ्याच कमी प्रेक्षकांना माहितीये की मिशकत आणि मिहिका सख्खे भाऊ- बहिण आहेत.
Alok Nath - Vineeta Malik: हिंदी कलाजगतामध्या संस्कारी बाबूजी, अशी ओळख असणाऱ्या आलोकनाथ यांची बहीण आहे, प्रसिद्ध अभिनेत्री विनीता मलिक. बऱ्याच मालिकांमध्ये विनीता महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकल्या आहेत.
Varun Badola - Alka kaushal: टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी वरुण बडोलाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्री अलका कौशलचा भाऊ अशीही त्याची ओळख आहे. तुम्हालाही माहिती नव्हतं ना हे नातं?
Meher Vij – Piyush Sahdev: मेहेर वीजला आज कोण नाही ओळखत? ‘सिक्रेट सुपरस्टार’पासून ‘बजरंगी भाईजान’पर्यंत जीवाचा आटापिटा करणाऱ्या आईच्या भूमिका तिनं साकारल्या. पियूष सहदेव आणि गिरीष महादेव यांची ती बहीण. बसला ना आश्चर्याचा धक्का?