मुंबई : राधा ही बावरी मालिकेतील राधानंतर आता श्रुती मराठे जागो मोहन प्यारे मधून भानूच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. यात ती मोहनला मदत करणाऱ्या एका जिनीची भूमिका साकारतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपूर्वीच श्रुती मराठे गौरव घाटणेकरसह विवाहबंधनात अडकली. मात्र ती आता पुन्हा एकदा बोहल्यावर चढतेय. बाशिंग बांधल्याचे तिचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेत. 


श्रुतीचे दुसरे लग्न ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित झालात ना...पण श्रुती रिअल लाईफमध्ये नव्हे तर रील लाईफमध्ये बोहल्यावर चढणार आहे. जागो मोहन प्यारे मालिकेत भानूच्या लग्नाच्या तयारीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेत.