मुंबई : बॉलिवूडमध्ये अव्वल स्थानी असलेल्या दबंग अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांच्या प्रतिक्षेत त्याचे चाहते नेहमीच असतात. त्याच्या आगळ्या-वेगळ्या कृतीतून तो चाहत्यांचे मनोरंजन करतो. सध्या त्याच्या 'भारत' चित्रपटाच्या चर्चा भलत्याच रंगत आहेत. सलमानचा बहुप्रतिक्षित 'भारत' चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचे टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मीठी-मीठी चाशनी' असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणं अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफवर चित्रीत करण्यात आले आहे.



खुद्द सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून गाण्याच्या टीझरचे प्रकाशन केले आहे. टीझर पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये 'इस ईद, इश्क मीठा हैं' असे लिहिले आहे. सोशल मीडियावर 'मीठी-मीठी चाशनी' चांगलाच जोर धरताना दिसत आहे. 


'भारत' चित्रपटा माध्यमातून पुन्हा एकदा सलमान आणि कतरिना जोडी आणि त्यांची केमिस्ट्री पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर हे कलाकारही चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 


'ओड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'भारत' चित्रपटात देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून ते २०१४ पर्यंतचा काळ रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.