मुंबई : 'मीठी-मीठी चाशनी' असे बोल असलेल्या गाण्याचे चित्रीकरण सलमान आणि कतरिना या दोघांवर करण्यात आले आहे. गाण्यात सलमान-कतरिना यांच्या नात्यातील गोडवा दाखवण्यात आला आहे. भारत देशाला राजेश खन्ना यांच्या रूपात पहिला सुपरस्टार मिळाला, पण त्यांना आवडत होते दिलीप कुमार...नंतर त्यांच्या जीवनात अगमन झाले सायरा बानू यांचे... गाण्यात सायरा बानो म्हणूण कटरिना झळकत आहे. 'मीठी-मीठी चाशनी' प्रदर्शित होताच इन्टरनेटवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाण्याची सुरूवात सलमानच्या आवाजात झाली आहे. गाण्यात पुढे दोघांमधील प्रेम बहरताना दाखवण्यात आले आहे. सोशल मीडियावर 'मीठी-मीठी चाशनी' चांगलाच जोर धरताना दिसत आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात सलमान चक्क कटरिना आणि दिशासह रोमांस करताना दिसणार आहे. चित्रपट डायलॉग आणि अॅक्शनने परिपूर्ण असणार आहे. विशेष म्हणजे सलमान तरूणाई पासून ते ७० वर्षाच्या वृद्धाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. 


'भारत' चित्रपटा माध्यमातून पुन्हा एकदा सलमान आणि कतरिना जोडी आणि त्यांची केमिस्ट्री पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर हे कलाकारही चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 


'ओड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'भारत' चित्रपटात देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून ते २०१४ पर्यंतचा काळ रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.