भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाची हटके लग्नपत्रिका
कॉमेडी क्विन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया येत्या ३ डिसेंबरला लग्नबंधनात अडकत आहेत.
मुंबई : कॉमेडी क्विन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया येत्या ३ डिसेंबरला लग्नबंधनात अडकत आहेत.
भारतीने काही महिन्यांपूर्वीच तिच्या लग्नाच्या प्लॅन विषयी माहिती दिली होती. त्यानुसार या वर्षअखेरीस भारती आणि हर्ष गोव्यामध्ये लग्न करणार आहेत.
भारती ही कॉमेडी शो मधुन रसिकांच्या भेटीला आली. अनेक शोचं, हिंदी अवॉर्ड शोचं तिनं सूत्रसंचालन केलं आहे. त्यामुळे कॉमेडीची राणी असणार्या भारतीचं वेडिंग कार्डही तितकंच हटके आणि मजेशीर आहे.
भारतीनं हर्षला खांद्यावर उचलून घेतलेला फोटो त्यांच्या वेडींग कार्डवर छापण्यात आला आहे. तसेच हे लग्न गोव्यात असल्याने तेथील निसर्गसौंदर्याप्रमाणेच या कार्डचं डिझाईनदेखील करण्यात आलं आहे.
एरवी स्त्री म्हणजे अबला, नववधू म्हणजे रडारड किंवा विशिष्ट पोशाखातील स्त्री असं चित्र रंगवलं जातं. पण भारतीने हे चित्र पुसून तिच्या नव्या क्षमतेची ओळख करून दिली आहे.
काही दिवसांपूर्वी हर्ष आणि भारती सिंगचं प्री-वेडिंग शूटचे फोटो समोर आले होते. त्यामध्येही दोघांनी धमाल मस्ती केली होती.
3 डिसेंबरला होणार्या लग्नविधीची तयारी जोरदार सुरू आहे. भारती आणि हर्षच्या लग्नाचे कपडे प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर निता लुल्ला डिझाईन करणार आहेत.