मुंबईः प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगला नुकतच तिच्या एका व्हिडिओवरून माफी मागावी लागली आहे. व्हिडिओमध्ये भारती सिंह दाढी मिशांबद्दल कॉमेडी करताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉमेडियन भारती सिंगने दाढी मिशांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. भारतीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी केला. भारती म्हणाली की, मी कॉमेडी लोकांना हसवण्यासाठी करते, कोणाचे मन दुखवण्यासाठी नाही. माझ्या बोलण्याने कोणाचं मन दुखावलं असेल तर मला तुमची बहीण समजून माफ करा, असही भारती म्हणाली.


अलीकडेच भारती सिंहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती दाढी मिशांबद्दल कॉमेडी करताना दिसत होती. एका टीव्ही शोमध्ये भारती सिंग म्हणताना दिसत आहे, "तुम्हाला मिशी का नाहीय? दाढी मिशीचे खूप फायदे आहेत, दूध प्या आणि दाढी तोंडात ठेवली, तर शेवयांचा स्वाद येतो. माझ्या अनेक मित्रांची लग्न झाली आहेत. ज्यांना मोठी दाढी आहे. तो दिवसभर दाढीतून उवा काढत असतो.


भारतींच्या या वक्तव्यावरुन गदारोळ सुरु आहे. ट्विटरवरून तिच्यावर जोरदार टीका होत आहे. याशिवाय शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने भारतीविरोधात पोलिस तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून भारती सिंगने एक निवेदन जारी करून माफी मागितली आहे.



भारती म्हणते की, मी तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला, तुम्हीही तो व्हिडिओ पहा, असे आवाहन तिनं केलंय. ती म्हणाली, "मी कुठेही कोणत्याही धर्म किंवा जातीबद्दल बोलले नाही किंवा या कोणत्या धर्माचे लोक दाढी ठेवतात असा उल्लेखही नाहीय. तुम्ही व्हिडिओ पहा. मी कोणत्याही पंजाबीबद्दल म्हटलं नाही की पंजाबी लोकांना दाढी मिशा आहेत. मी माझ्या मित्रासोबत कॉमेडी करत होते... माझ्यामुळे कुणीा दुखावले असेल तर मी हात जोडून माफी मागतो.


भारती सिंहने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ती स्वतः पंजाबी असून तिचा जन्म अमृतसरमध्ये झाला आहे. त्यामुळे ती पंजाबचा पूर्ण सन्मान करते. मला पंजाबी असल्याचा अभिमान असल्याचेही भारतीनं म्हटलंय