मुंबईः आलिया-रणबीरचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, या सोहळ्याला हजेरी न लावता आल्याने भारती सिंगने आलियाच्या सासू म्हणजे नीतू कपूर यांच्याकडे आलियासाठी खास गिफ्ट पाठवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीतू कपूर यांनी नुकतंच 'हुनरबाज' या रियालिटी शोच्या सेटवर हजेरी लावली. या कार्यक्रमात स्पर्धकांसह नीतू कपूर यांनी चांगलीच धमाल केली. मात्र सूत्रसंचालकाच्या भूमिकेतील भारती सिंगने लग्नाला येता न आल्याने नीतू यांच्याकडे यावेळेस खंत व्यक्त केली. तसंच आलियासाठी खास गिफ्टही दिलंय


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हुनरबाजच्या सेटवर नीतू कपूर यांच्या हातात भारतीने गिफ्ट सुपुर्द केलं. नीतू कपूर यांनी सर्वांसमोर गिफ्ट उघडलं आणि त्यात होता प्रेशर कुकर. हे गिफ्ट देण्यामागचं कारणही भारतीने यावेळी सांगितलं. लग्नात रणबीर थोडा बारीक दिसतोय त्यामुळे आलियासाठी हे खास गिफ्ट देतेय.


आलियाने या कुकरमध्ये छान जेवण बनवून रणबीरला खाऊ घालावं यासाठी हा कुकर देत असल्याचं गमतीत भारतीने म्हटलं. यादरम्यान सेटवर एकच हशा पिकला. नीतू यांनीही भारतीला आपण हा कुकर आपल्या लाडक्या सुनेला नक्की देणार असल्याचं सांगितलं


रणबीर आणि आलियाच्या लग्नासाठी चाहत्यांसह कपूर कुटुंबही तितकंच उत्सुक होतं. अखेर दोघांचं लग्न पार पडलं आहे. मात्र लग्नाला उपस्थित न राहिल्याने भारती सिंगने आलियाला असं काही गिफ्ट दिलं आहे की तुम्ही म्हणाल की भारतीने आलियाला अगदी 'योग्य' गिफ्ट दिलं आहे कारण आलियाला स्वयंपाक करता येत असेल की नाही याबाबत आलियाच्या चाहत्यांना शंकाच आहे