`सासू, आईपासून प्रेग्नंसीची बातमी लपवली, वाईट...`; `या` कारणामुळे भारतीनं 4 महिने सांगितली नाही Good News
Bharti Singh Hide Pregancy News From Family : या कारणामुळे भारती सिंगनं कुटुंबापासून लपवली होती Good News
Bharti Singh Hide Pregancy News From Family : कॉमेडी क्वीन भारती सिंग ही फक्त तिच्या विनोदांसाठी ओळखली नाही जात तर त्यासोबत तिच्या सुत्रसंचालनासाठी देखील ओळखली जाते. भारती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या भारती चर्चेत येण्याचं कारण तिची एक मुलाखत आहे. तिनं या मुलाखतीत तिच्या प्रेग्नंसीवर चर्चा केली आहे. भारतीनं सांगितलं की तिनं तिच्या सासु-सासरे आणि आई त्यासोबत इतर अनेकांपासून तिच्या प्रेग्संसीविषयी लपवून ठेवलं होतं. त्याशिवाय तिची परिस्थिती कशी झाली होती याविषयी देखील तिनं सांगितलं.
भारतीनं हर्ष लिंबाचियाशी 2017 मध्ये लग्न केलं आणि लग्नाच्या 5 वर्षानंतर म्हणजेच 2022 मध्ये भारतीनं मुलगा लक्ष्यला जन्म दिला. तर जेव्हा ती प्रेग्नंट होती तेव्हा तिचा नवरा हर्ष लिंबाचियानं तिला खूप सांभाळल्याचं तिनं सांगितलं. भारतीनं ही मुलाखत छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देबीना बॅनर्जीला दिली होती. त्यावेळी भारतीनं सांगितलं की जेव्हा ती प्रेग्नंट होती तेव्हा तिचा नवरा हर्षनं तिच्या प्रेग्नंसीच्या पूर्ण काळात तिला सांभाळलं होतं.
भारतीनं पुढे सांगितलं की डॉक्टरांनी 4 महिन्यांपर्यंत प्रेग्नंसीविषयी कोणालाही सांगू नका असं सांगितलं होतं. त्यामुळे अशात भारती किंवा हर्षला या काळात कोणत्याही स्त्रीची मदत किंवा कशी काळजी घ्यायची, काय काय करायचं याविषयी काही कळालं नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
भारती पुढे म्हणाली, तुमचा सगळ्यात चांगला मित्र तुमचा नवरा असतो. कारण 4 महिने हर्षनं मला सांभाळलं होतं. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की कोणालाही सांगू नका. त्यामुळे ना माझ्या सासूला किंवा माझ्या आईला सांगितलं नाही. 4 महिने बाळा पोटात ठेवून मी 'डान्स दिवाने'चं शूट करत होते. उलट्या करत होते. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. समजवायला कोणीही नव्हतं. मी व्हॅनिटी माइक बंद करून उल्टी करायचे. जेणे करून स्टेवर कोणाला आवाज जाणार नाही.
पुढे भारतीनं याविषयी सांगितलं की जेव्हा कोणी तिला तब्येतीविषयी विचारायचं तर ती अॅसिडीटी झाल्याचं कारण सांगायची. भारतीनं सांगितलं की त्या काळात तिच्या नवऱ्यानं तिची काळजी घेतली.
4 महिन्यांनंतर जेव्हा भारतीनं तिच्या संपूर्ण कुटुंबाला तिच्या प्रेग्नंसीविषयी सांगितलं तेव्हा त्यांच्या कुटुंबाला खूप वाईट वाटलं होतं. खरंतर त्यांना आनंद झाला होता पण त्यांना या गोष्टीचं वाईट वाटत होतं की इतके महिने त्यांनी ही आनंदाची गोष्ट त्या सगळ्यांपासून लपवून ठेवली. त्या काळात तिच्या कुटुंबानं तिला काम न करण्याचा सल्ला दिला होता. पण भारतीला काम करायचं होतं. त्यामुळे प्रेग्नंसीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ती काम करत होती.