मुंबईः बॉलिवूडची कॉमेडी क्वीन भारती सिंहने 3 एप्रिलला मुलाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर 12 दिवसातच पुन्हा कामावर येत भारतीने कामाप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली..सेटवर जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर भारती माध्यमांशी संवाद साधते..यादरम्यान भारतीने बाळाबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत..12 दिवसांच्या बाळाला घरी सोडून कामावर आलेली भारती सिंह बोलताना काहीशी भावुक झालेली दिसून आली... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हुनरबाज'च्या सेटवर आलेल्या भारतीला तिच्या बाळाची आठवण येते. कधी एकदा बाळाला जवळ घेते अशी भावना असल्याचं भारतीने सांगितलं..काम सुरू असताना भारती बाळाला व्हिडीओ कॉलद्वारे पाहते मात्र यावेळी आपल्याला रडू येत असल्याचं भारती म्हणते.


बाळाच्या जन्मानंतर 12 दिवसात कामावर आलेल्या भारतीनं म्हटलं, की शो सुरू राहिला पाहिजे, बाळा अद्याप लहान आहे. त्याला सध्या आई-वडिलांची ओळख नाही, तो दूध पितो आणि झोपी जातो त्यामुळे आपण कामावर आल्याचं भारती सांगते.


आई झाल्यानंतर आयुष्य कसं बदललं याबद्दल भारती सांगते की, कामावर असले तरी पूर्णवेळ बाळाचाच विचार डोक्यात असतो. असं वाटतं की आणखी एक बाळ असावं असं गमतीत भारतीनं सांगितलं.


 माध्यम प्रतिनिधींनी यावेळी भारतीला जरा सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला तेव्हा भारतीने मिश्किल अंदाजात म्हटलं की लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली आहे. मुलगा झाला तर म्हणतात बहीण हवी आणि मुलगी झाली तर म्हणतात भाऊ हवा. म्हणजे आम्ही जोड्याच बनवत राहायच्या?


यापूर्वीही सेटवरचा भारतीचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात तिनं म्हटलं होतं. बाळाला घरी सोडून आल्यामुळे दुःख होतंय मात्र काम हे काम असतं. भारती आणि हर्ष लिंबाचिया यांनी 3 एप्रिलला मुलाला जन्म दिल्यानंतर भारतीने पुन्हा कामात स्वतःला झोकून दिलं आहे.


कोणत्याही आईसाठी आपल्या तान्ह्या बाळाला आपल्यापासून दूर ठेवणं ही तशी कठीणच गोष्ट आहे मात्र करियर आणि घर अशा दुहेरी भूमिका साकारताना महिलांची तारांबळ होते आणि त्यातच लहान मूल असेल तर आणखीच अवघड. त्यामुळे लहान बाळाला घरी सोडून कामावर वेळेत हजर झालेल्या भारतीचं सर्वत्र कौतुक होतंय