मुंबई : भारताची प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh)  यंदाच्या वर्षी आई झाली आहे. तिनं आपल्या मुलाचं नाव लक्ष्य ठेवले आहे. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) या मुलाला प्रेमाने 'गोला' म्हणतात. 'गोला'च्या गोंडसपणामुळे चाहतेही थक्क झाले आहेत. मात्र, भारतीला तिचा मुलगा गोलाने वयाच्या १६ किंवा १८ व्या वर्षी काम करावे असे वाटते. अलीकडेच भारतीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीनं अभिनेत्री नेहा धुपियासोबत इन्स्टाग्राम लाइव्ह करताना हा खुलासा केला आहे. लक्ष्यचा जन्म झाल्यानंतर काम करण्याबद्दल बोलताना भारती म्हणाली, 'हर्ष आणि मी सध्या लिमिटेडमध्ये काम करत आहोत. नवीन प्रोजेक्ट्सवर काम सुरू करण्यापूर्वी आम्ही त्यावर खूप विचार करतो. काम खूप महत्वाचं आहे. कारण आम्हाला त्याची गरज आहे. आम्हाला विश्वास आहे की आपण त्याला काही वर्षे दिली पाहिजेत. 



भारती पुढे म्हणाली, 'अमेरिकेतील मुलं ज्या प्रकारे लहान वयात शाळेत जातात आणि काम करतात. मला ती जीवनशैली फार आवडते. माझा विश्वास आहे की16 किंवा 18 वर्षानंतर तुम्ही तुमच्या पालकांकडून आर्थिक मदत घेऊ नये. भारती सिंगचा मुलगा शिकत असून मॅकडोनाल्डमध्ये काम करतो. भारतीची मुलगी शिकते आणि सलूनमध्ये काम करते. माझ्या मुलांनी पार्ट-टाईम काम केले तर मला आनंद होईल कारण आजकाल जगणं फार कठीण आहे, विशेषतः मुंबईसारख्या शहरात. 


भारतीने सांगितले की, मुलगा गोलाच्या जन्मानंतर तिचा आनंद द्विगुणित झाला आहे. पुढे भारती म्हणाली, 'अनेक लोक म्हणाले की, मूल झाल्यावर माझं आयुष्य संपेल. मला त्यांना सांगायचे आहे की तुम्ही चुकीचे आहात. माझा आनंद द्विगुणित झाला, माझे हास्य द्विगुणित झाले.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीला नेटकऱ्यांनी तिच्या मुलाच्या फोटोशूटमुळे ट्रोल केलं होतं. भारतीचा मुलगा लक्ष्य सफेद कपड्यात खुर्चीवर बसलेला. त्याच्या क्यूट लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, पण या फोटोंमध्ये एक अशी गोष्ट आहे जी पाहिल्यानंतर नेटकरी संतापले आहेत. या फोटोंमध्ये भारती सिंहच्या मुलाच्या बाजूला हुक्का ठेवलेला दिसत होता. त्याशिवाय भारती सिंहने याआधी तिच्या मुलाचं हॅरी पॉटर लुकमध्ये देखील फोटोशूट केलं होतं. जे चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. पण आता काहीतरी हटके करण्याच्या नादात मात्र भारती सिंहचा अंदाज फसला. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर ४ वर्षांनी २०२१ मध्ये भारतीने प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये भारती सिंहनं मुलाला जन्म दिला होता