सावळ्या रंगावरून Bhau Kadam च्या लेकिचं लक्षवेधी वक्तव्य; एकाएकी चर्चांना उधाण...
Bhau Kadam Daughter Mrunmayee : भाऊ कदमची लेक मृण्मयी ही नेहमीच तिच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते. सध्या मृण्मयी सोशल मीडियावर चर्चेत येण्याचं कारण तिचं डस्की स्किनवर असलेलं तिचं वक्तव्य आहे. मृण्मयीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Bhau Kadam Daughter Mrunmayee : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' हा कॉमेडी शो चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदम हा त्याच्या विनोदी बुद्धी आणि विनोदाच्या पर्फेक्ट टायमिंगसाठी ओळखला जातो. भाऊ कदम प्रमाणे त्याची लेक देखील तितकीच चर्चेत असते. भाऊ कदमची लेक मृण्मयी कदम ही सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. तिचे अनेक मेकअप, फॅशन किंवा मग लाइफस्टाइलचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहतो. आता मृण्मयीनं नुकतीच एक पोस्ट शेअर करत तिच्या डस्की स्किन म्हणजेच सावळ्या रंगावर वक्तव्य केलं आहे.
मृण्मयी बऱ्याचवेळा 'चला हवा येऊ द्या' शोच्या सेटवर दिसते. बऱ्याच बॉलिवूड कलाकारांसोबत मृण्मयी फोटो शेअर करताना दिसते. तिचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. अशात नुकतीच मृण्मयीनं लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत मृण्मयीला तिच्या डस्की स्किन टोनमुळे फॅशन इंडस्ट्रीत काम करताना काही अडचणी येतात का असा सवाल केला होता. त्यावर उत्तर देत मृण्मयी म्हणाली, मी ज्या कुटुंबातून आले तिथे असे काही होत नाही. स्किनटोनवरून वेगळी वागणूक तर मुळीच नाही. खरंतर माझ्या घरात काका, आजी, पप्पा सगळेच सावळे आहेत. माझी आई फक्त गोरी आहे. पण त्यानं काही फरक पडत नाही. माझ्या लहानपणापासूनच मला कोणी त्वचेच्या रंगावरुन हिणावलं नाही”.
पुढे तिच्या युट्यूब अकाऊंटविषयी बोलताना मृण्मयी म्हणाली, "मी जेव्हा माझं युट्यूब चॅनल सुरु केलं, तेव्हा माझ्या डोक्यात स्किन टोनचा विचार कधीच आला नाही. खरंतर त्यात इतका काय विचार करायचा आणि लोकांना का इतका फरक पडतो हे मला समजतच नाही. मला इतका आत्मविश्वास कुठून आला असं अनेकांनी मला विचारलं. माझा स्किन टोन डस्की असल्यानं मी त्यांच्यातलीच एक आहे असे त्यांना वाटते. हेच तुम्ही एखाद्या गोऱ्या मुलीला विचाराल का? असा सवाल मृण्मयीनं केला.
मृण्मयी सध्या सोशल मीडियावर आणि तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेकअपचे व्हिडीओ शेअर करताना दिसते. मृण्मयीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर तिचे सध्या युट्यूबवर 42 हजार फॉलोवर्स आहेत. तिच्या पोस्ट या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेच्या विषय ठरतात. इतकंच काय तर मृण्मयी तिच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर कमेंट करत उत्तरही देते