मुंबई : चला हवा येऊ द्या या झी मराठीच्या मालिकेत भाऊ कदमने खाष्ट सासूची भूमिका साकारली आहे. ही सासू खाष्ट दिसत असली, तरी ती अन्याय कमी आणि विनोदच जास्त करताना दिसतेय. सोबत कुशल बद्रिकेसारखी सून तिच्या पदरी पडल्यावर आणखी गंमत येतेय, आणि पदरी पडलं पावन झालं असं न म्हणता हास्याचे फवारे उडतायत.


भाऊ कदमजवळ या एपिसोडमध्ये वाघ देखील आहे, आणि बंदूक देखील आहे, ज्याने तो वाघ मारला आहे, पण भाऊ कदमच आता सांगू शकणार आहे, तो वाघ त्याने कुठून मारला जंगलात जावून बंदुकीने मारला की आणखी दुसऱ्या ठिकाणाहून...भाऊ कदम रूपी ही खाष्ट सासू तुम्ही चला हवा येऊ द्या मध्ये या एपिसोडमध्ये पाहाच...