भाऊ कदमनं सोडली इंडस्ट्री? कॉमेडीवीरचा `हा` फोटो होतोय व्हायरल
Bhau Kadam : भाऊ कदम यांचा एक नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो पाहता त्यांनी इंडस्ट्री सोडली की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
Bhau Kadam : आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या अभिनेता भाऊ कदम यांचा चाहता वर्ग मोठा आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून भाऊ कदम आपले नेहमीच मनोरंजन करताना दिसतात. त्यात भाऊ यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्या फोटोतील भाऊचा लूक पाहिल्यानंतर त्यांनी इंडस्ट्री सोडली की काय असा प्रश्न अनेकांसमोर उपस्थित राहिला आहे. अशात आता एक नवी माहिती समोर आली आहे. आपल्या आवडत्या कलाकाराची भेट व्हावी असं प्रत्येक प्रेक्षकांना वाटत असतंच. पण भाऊ कदम यांच्या दर्शनासाठी लोकांच्या लांब रांगा लागतायेत हे ऐकून तुम्हीसुद्धा दचकला असाल ना! त्यांचं दर्शन मिळावं यासाठी झुंबड उडतेय. विश्वास बसत नाही ना! मग 'एकदा येऊन तर बघा'.
8 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'एकदा येऊन तर बघा' या आगामी चित्रपटात भाऊ कदम एका खास भूमिकेत दिसणार आहेत. ‘बाबा गुलाबी गरम’ ही व्यक्तिरेखा ते यात साकारणार आहेत. अडचणीत असलेल्या भक्तांना मार्गदर्शन देणारे ‘बाबा गुलाबी गरम’ यांची लीला चित्रपटात पहाण्याची गंमत वेगळी आहे. लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. आपल्या भूमिकेविषयी भाऊ सांगतात, ‘खूप मजेशीर अशी ही व्यक्तिरेखा आहे. हा ‘बाबा गुलाबी गरम’ प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करणार असा विश्वास ते व्यक्त करतात. भाऊ कदम यांच्या सोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार असे एक सो एक विनोदवीर या चित्रपटात आहेत.
'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे. कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. मनोज अवना आणि कृपाल सिंग कार्यकारी निर्माते आहेत. लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत. 8 डिसेंबरला 'एकदा येऊन तर बघा' सर्वत्र प्रदर्शित होतोय.