भाऊ कदम ची मुख्य भूमिका असलेला `जगावेगळी अंतयात्रा`!!
सध्या मराठी चित्रपटातून सातत्याने नवनवीन प्रयोग होताना दिसताहेत, त्यातच एका नाविन्यपूर्ण विषयाला हात घालणारा चित्रपट म्हणजे `जगावेगळी अंतयात्रा`
मुंबई : सध्या मराठी चित्रपटातून सातत्याने नवनवीन प्रयोग होताना दिसताहेत, त्यातच एका नाविन्यपूर्ण विषयाला हात घालणारा चित्रपट म्हणजे "जगावेगळी अंतयात्रा"
अल्टीमेट फिल्म मेकर्स प्रा.ली.बनर खाली डॉ .नितीन श्याम तोष्णीवाल निर्मित आणि अमोल लहांडे दिग्दर्शित या चित्रपटात भाऊ कदम, माधव अभ्यंकर ,राजन भिसे ,सुहास परांजपे या दिग्गज कलावंतान बरोबरच सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित , विनम्र भाबल, डॉ.विशाल गोरे आणि शिवानी भोसले या नवोदित कलावंतांचाही समावेश आहे.
जगावेगळी अंतयात्रा
नोकरी हा आजच्या तरुण पिढीसमोर भेडसावणारा गंभीर प्रश्न, त्यात उच्च विद्या विभूषित तरुणांपुढे जर हा विषय आला तर त्या अडचणीं पुढे ते कुठल्या पद्धतीने सामोरे जातात आणि त्यांच्या कर्तुत्वाने ते इतरांपुढे काय आदर्श घालून ठेवतात ही गंमत या चित्रपटात पाहण्यासारखी आहे.
गंभीर विषयाला विनोदी अंगाने मांडण्याचा केलेला प्रयत्न या चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे, हसता हसता एका महत्वाच्या समस्येबाबतही हा सिनेमा विचार करायला प्रवृत्त करणारा असल्याचे दिग्दर्शक अमोल लहांडे यांनी सांगितले.
काय आहे सिनेमांत?
एक नवीन विषय,त्याची केलेली सुंदर मांडणी,त्याला साजेशे कलावंत, त्याच बरोबर आजच्या आघाडीच्या संगीतकार जोडी रोहन-रोहन यांचे उत्तम संगीत,मनाला भुरळ घालणारी गाणी, सिध्दार्थ महादेवन ,महालक्ष्मी अय्यर ,वैशाली सामंत सुरेश वाडकर आणि रोहन प्रधान या सारख्या दिग्गज गायकांचा सुमधुर स्वरसाज या आणि अशा अनेक बाजूनी परिपूर्ण असा हा चित्रपट रसिकांच्या पसंतीस नक्की उतरेल यात शंकाच नाही.
येत्या २३ मार्चला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.