भाऊ कदम जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत येतो
भाऊ कदम जेव्हा मुख्यमंत्री बनतो...
मुंबई : गेली साडे तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांना पोटधरुन हसवत आहे. नुकताच या मालिकेने 400 ऐपिसोड पूर्ण केले आहेत. 400 व्या खास एपिसोडमध्ये भाऊ कदम जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भूमिकेत दिसतो तेव्हा काय होतं पाहा हा व्हिडिओ...
कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली साडे तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवूड मंडळींनी हजेरी लावली आहे.