Bhojpuri Actor Khesari Lal Yadav: अनेकदा मोठ्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याच्या घटना समोर येत असतात. अशीच घटना प्रसिद्ध सिंगर आणि अॅक्टर खेसारी लाल यादव यांच्या कार्यक्रमात घडली आहे. अनेकांना मागे सोडत खेसारीने आपली नवी ओळख तयार केली. त्यानंतर आता त्याच्या फॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, त्याच्या एका कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) हा केवळ चित्रपट आणि चित्रपटांमध्ये गाण्यापुरता मर्यादित नसून स्टेज शोमध्येही त्यांना प्रचंड मागणी आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजारो लोक जमतात. यावेळीही बिहारच्या राजौली येथे आयोजित स्टेज शोमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. चाहत्यांचा प्रचंड उत्साह त्याला मिळत होता.


आणखी वाचा- चुकीला माफी नाही! Yogi Adityanath यांनी DSP ची केली थेट शिपाई म्हणून नियुक्ती!


चाहत्यांनी त्याला शर्ट काढण्याची मागणी (Shirtless) केली. त्यानंतर उत्साहाच्या भरात खेसारी सर्वांसमोर शर्टलेस झाला. त्यानंतर चाहत्यांनी जोरदार गोंधळ घातला. त्यावेळी कार्यक्रम स्थळी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा एक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.


पाहा व्हिडीओ- 



दरम्यान, त्याचवेळी खेसारी पाहण्यासाठी आलेले हजारो लोक अनियंत्रित झाल्याचं दिसतंय आणि यादरम्यान संपूर्ण कार्यक्रमात गोंधळ उडाला होता. अनियंत्रित जमाव झाल्याने आणि चेंगराचेंगरी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यावेली प्रेक्षकांनी तोडफोड केल्याची देखील माहिती मिळाली आहे.