Bhojpuri Actress Akshara Singh : औरंगाबादच्या दाऊदनगरमध्ये भोजपुरी चित्रपटांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री अक्षरा सिंहवर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला कोणी दुसऱ्यानं नाही तर तिच्या चाहत्यांनी केला आहे. या हल्ल्यात अक्षरा वाचली आहे. तर तिला या सगळ्यातून वाचवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. अक्षरा सिंहवर हल्ला का झाला आणि तिच्या चाहत्यांना कोणत्या गोष्टीचा राग आला, त्याचं कारण देखील समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, अक्षरा ही दाउदनगरमध्ये एका शोरूममध्ये उद्घाटन करण्यासाठी बुधवार 17 जानेवारी रोजी दुपारी पोहोचली होती. पण धूक्यामुळे फलाइट लेट झाल्यामुळे दुपारी पोहोचण्या ऐवजी ती संध्याकाळी दाइदनगर पोहोचली होती. त्यामुळे तिच्या चाहत्यांना खूप राग आला. मात्र, जेव्हा अक्षरा पोहोचली, तेव्हा सेल्फी घेण्यासाठी तिच्या चाहत्यांनी गर्दी केली होती आणि तिचे सगळे चाहते तिच्या शेजारी गोळा झाले. हे औरगांबाद बिहारमध्ये आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी गर्दी अनियंत्रीत झाली. लोकांना सांभाळणं कठीण झालं होतं. या दरम्यान, काही चाहत्यांना दुखापत झाली. दुखापत झाल्यानं सगळ्यांना धक्का बसला. या दरम्यान, ज्यांना जास्त दुखापत झाली होती त्यांनी अक्षरा सिंहवर हल्ला केला. त्यांनी तिच्यावर दगड फेकण्यास सुरुवात केली. खरंतर, तिथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी अक्षराला वाचवलं. ज्यामुळे तिला दुखावत झाली नाही. 


अक्षराला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस कर्मचाऱ्याला दुखापत झाली. त्याचं डोकं फुटलं. जखमी पोलिस कर्मचाऱ्यावर दाऊदनगर येथील शासकीय उपविभागीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, घटनास्थळी काही काळ गोंधळ उडाला होता, त्यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवले. या घटनेनंतर अक्षरा दौडनगर येथून सुखरूप परतली आहे. तर हे सगळं सुरू असताना तिथे आलेल्या लोकांनी धावपळ सुरु केली होती. ज्या गर्दीला सांभाळणं पोलिसांसाठी कठीण झालं होतं. तर त्या ठिकाणावरुन अक्षराला सुरक्षित बाहेर आणण्यात आलं आहे. 


हेही वाचा : 'शरम नाही...'; जया बच्चन यांनी ऐश्वर्याच्या इंटिमेट सीन्सवर साधला होता निशाणा?


अक्षरा सिंहवर 2022 मध्ये देखील हल्ला झाला होता. तेव्हा ती महाराष्ट्रच्या बदलापुर महोत्सवार पोहोचली होती. तिथे देखील तिच्यावर दगडफेक करण्यात आली होती. अक्षरा त्यावेळी देखील त्यातून वाचली होती. त्यानंतर सोशल मीडियावर हेटर्सना सडेतोड उत्तर देत व्हिडीओ शेअर केला होता. अक्षरा भोजपुरी चित्रपटांशिवाय 'बिग बॉस OTT' मध्ये देखील दिसली होती.