'शरम नाही...'; जया बच्चन यांनी ऐश्वर्याच्या इंटिमेट सीन्सवर साधला होता निशाणा?

Jaya Bachchan -Aishwarya Rai : जया बच्चन यांनी नाव न घेता केला ऐश्वर्या रायच्या इंटिमेट सीनवर साधला निशाणा...

दिक्षा पाटील | Updated: Jan 18, 2024, 11:51 AM IST
'शरम नाही...'; जया बच्चन यांनी ऐश्वर्याच्या इंटिमेट सीन्सवर साधला होता निशाणा?  title=
(Photo Credit : Social Media)

Jaya Bachchan -Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही सगळ्यात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तिचा अप्रतिम असा अभिनय हा सगळ्यांच्या मनावर राज्य करतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे की ऐश्वर्या ही बच्चन कुटूंबासोबत राहत नाही. या सगळ्या चर्चांवर बच्चन कुटुंबानं कधीच काही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, एका कार्यक्रमात जया बच्चन यांनी असं वक्तव्य केलं आहे की सगळ्यांना आश्चर्य झालं होतं. 

खरंतर, लग्नानंतर ऐश्वर्यानं 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटात रणबीर कपूरसोबत काही स्टीमी सीन दिले होते. तर तिची सासू जया बच्चन यांनी पुन्हा एकदा त्यावर वक्तव्य केलं आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या इंटिमेट सीनवर आक्षेप घेतला आहे. Jio MAMI 18 व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये जया बच्चन यांनी बिमल रॉय आणि त्यांच्या कामाची स्तुती केली होती. जया बच्चन यांनी आजकालच्या चित्रपटांवर नाराजी व्यक्त करत सांगितले की आजचे चित्रपट हे मोठ्या प्रमाणात बिझनेससाठी बनवण्यात येतात. तर लोकांना त्या आकड्यांशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा ते विचार करत नाही. 

अलीकडच्या, चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या इंटिमेट सीन्सवर जया बच्चन यांनी टीका केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या, लोकांना आता असे सीन्स करताना लाज वाटत नाही कारण ते बारकावे विसरले आहेत. आजच्या काळात प्रेम हे खुले प्रदर्शन म्हणून कसंही दाखवतात. दरम्यान, जया बच्चन यांनी कधीच ऐश्वर्याच्या 'ऐ दिल है मुश्कील' या चित्रपटाला उल्लेख केला नाही. तरी चित्रपटांमधील इंटिमेट सीन्सवर त्यांचे जे वक्तव्य केलं आहे. त्यावरून नक्कीच त्या सगळ्या चित्रपटांविषयी बोलल्या असणार. त्यावेळी त्या एक गोष्ट म्हणाल्या ती म्हणजे, 'लाज नावाची कोणती गोष्ट नाही आहे.'

जया बच्चन यांनी 'ऐ दिल है मुश्किल' मध्ये ऐश्वर्याच्या भूमिकेविषयी थेट न बोलता सध्याच्या चित्रपटांवर केलेल्या इंटिमेट सीन्सवर आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे, अमिताभ बच्चन यांनी कथितपणे ऐश्वर्याच्या याच चित्रपटातील भूमिकेची स्तुती केली होती. अनेक रिपोर्ट्सनुसार, 22 व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्लमध्ये भाषण देत अमिताभ यांनी सध्याच्या चित्रपटातील महिलांविषयी वक्तव्य केलं आणि त्याच दरम्यान, त्यांनी त्यांच्या  सुनेविषयी काही चांगल्या गोष्टी म्हटल्या होत्या.