मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रीसह (Bollywood Actress) अशा अनेक इतर इंडस्ट्रीतल्या अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र या अभिनेत्री नुसत्या ओळखी पुरत्याच मर्यादीत राहिल्या नाही आहेत, त्या स्वत:च्या पायावर सक्षम उभ्या देखील आहेत. या अभिनेत्री आहेत भोजपूरी इंडस्ट्रीमधल्या. या अभिनेत्री करोडोच्या मालकीण आहेत. त्यांच्या कमाईचा आकडा ऐकून एका बॉलिवूड अभिनेत्रींना देखील धक्का बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोजपुरी इंडस्ट्रीत (Bhojpuri Industry) अशा अनेक अभिनेत्री ज्या अभिनयासोबत सौंदर्यातही खुप आघाडीवर आहे. या अभिनेत्रींची खुप चर्चा असते. या अभिनेत्री आहेत मोनालिसा (monalisa), आम्रपाली दुबे (amrapali dubey), अक्षरा सिंह (akshara singh) आणि राणी चॅटर्जी (rani chatterjee). या अभिनेत्री आहेत करोडोंच्या मालकीण.या अभिनेत्रींची नेमकी कमाई किती आहेत, ते जाणून घेऊयात. 


मोनालिसा: भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा (monalisa) ही इंडस्ट्रीतली आघाडीची अभिनेत्री आहे.मोनालिसाने भोजपुरी इंडस्ट्रीतील जवळपास प्रत्येक अभिनेत्यासोबत काम केले आहे.मोनालिसा बिग बॉस शोमध्ये देखील दिसली होती. इतकी वर्ष इंडस्ट्रीत राहून देखील तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार मोनालिसा 18 कोटींची मालकिन आहे.


अक्षरा सिंह : अभिनेत्री अक्षरा सिंह (akshara singh) सध्याच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये देखील अक्षरा सिंह दिसली होती. या शोनंतर ती घराघरात पोहोचली होती. या शोनंतर तिने तिची फी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अल्पावधीत अक्षरानेही भरपूर संपत्ती कमावली आहे. अक्षरा सिंह 50-60 कोटींच्या मालमत्तेची मालकीण असल्याची माहिती आहे. 


आम्रपाली दुबे: आम्रपाली दुबेने (amrapali dubey) 2014 मध्ये निरहुआ हिंदुस्तानीमधून पदार्पण केले होते. गेल्या 8 वर्षात ती भोजपुरी इंडस्ट्रीतली आघाडीची अभिनेत्री बनली आहे. तिच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर आम्रपाली एका चित्रपटासाठी 10 ते 15 लाख घेते, तर तिची एकूण मालमत्ता 14 कोटी रुपये आहे.


राणी चॅटर्जी: राणी चॅटर्जी (rani chatterjee) भोजपुरीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 300 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केलेली ही राणी एका चित्रपटासाठीही भरमसाठ फी घेते, तिच्या एकूण कमाईबद्दल सांगायचे तर ती 41 कोटींहून अधिक संपत्तीची मालक आहे.


दरम्यान या अभिनेत्री भोजपूरी इंडस्ट्रीतल्या असल्या तरी कमाईच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींना मागे टाकतात.