अश्लील समजल्या जाणाऱ्या या नृत्यावर आता सिनेमा येतोय
भोजपुरीत येणार `नचनिया` नावाचा सिनेमा रिलीज होण्याआधीच चर्चेत आहे.
नवी दिल्ली: भोजपुरी सिने इंडस्ट्रीत एक अशा विषयावर सिनेमा येतोय ज्याला अश्लिलतेशी जोडले गेले आहे. भोजपुरीत येणार 'नचनिया' नावाचा सिनेमा रिलीज होण्याआधीच चर्चेत आहे. नृत्य आणि त्यासंबंधी जोडल्या गेलेल्या लोकांची व्यथा चांगल्या पद्धतीने या सिनेमातून मांडण्यात आली आहे.
या चित्रपटाचे गांभीर्य लक्षात घेऊन सेंन्सॉर बोर्डाकडून याला हिरवा कंदिल मिळाला आहे. बिहारच्या स्थानिक नृत्य संस्कृतीवर आधारित असलेल्या 'नचनिया' ला सेन्सॉरने 'यू-सर्टिफिकेट' दिल्याने सर्वांचे लक्ष याकडे गेले आहे.
ही संकल्पनाच मूळात अद्वितीय आहे. बिहार आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील लोहदा नृत्य खूपच प्रसिद्ध आहे. पण याची जागा ऑर्केस्ट्राने घेतली आणि नृत्याच्या नावाखाली ओघांळवाणे प्रदर्शन दिसू लागले. त्यामूळे ही संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर आली. याच्याशी संबंधित कलाकारांची व्यथा नचनिया मधून मांडण्यात आल्याचे निर्माते विशाल दुबे आणि दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी सांगितले.
या सिनेमाचे दोनवेळा स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. भोजपुरी सिनेमातून अश्लिलता दिसते असे मानणाऱ्या व्यक्तिंनाही हा सिनेमा दाखविण्यात आला. पण प्रत्येकाने या चित्रपटाची प्रशंसा केली. 'जय ओम प्रॉडक्शन'च्या या सिनेमात सर्व कलाकार नवीन आहेत. सिनेमाच्या रिलीजची तारीखही लवकरच जाहीर केली जाणार आहे.