नवी दिल्ली : राखी सावंत लवकरच भोजपुरी सिनेमात दिसणार आहे. नुकतीच तिने भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहसोबत शुटींग केली आहे. तिने आपल्या शुटींगचे फोटो इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहेत. राखीने हे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. सध्या भोजपुरी सिनेमांकडे राखीचा कल जास्त पाहायला मिळतोयं. सध्या ती भोजपुरी सिनेस्टार्ससोबत स्टेज शेअर करतानाही दिसतेयं.


राखी म्हणजे नीरु भेदा 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जेव्हा निर्मात्यांनी राखीला काम देण्यास नकार दिला होता तेव्हा तिने आपल्या रंग-रुपात सुधार आणण्यासाठी सर्जरी केली होती.  राखीचं खरं नाव नीरू भेद आहे. नुकतीच तिने 'जज्बात संगीनसे नमकीन तक'च्या एपिसोडची शूटींग पूर्ण केली. जेव्हा शोचे अॅंकर राजीव खंडेलवाल यांनी राखीला नीरू म्हणून हाक मारली तेव्हा ती भावूक झाली. 


घरून परवानगी नाही 



 'माझ्या परिवाराने मला मनोरंजन क्षेत्रात जाण्याची परवानगी कधीच दिली नाही. मला नाचताना पाहून ते माझी पाठ लालपिवळी करायचे.



अखेर मी जेव्हा मुंबईत पोहोचले तेव्हा निर्मात्यांसमोर माझा नाच आणि प्रतिभा दाखविण्यास सुरूवात केली, ज्यांनी मला वाईट नजरेनेही पाहिले', असे राखीने यावेळी सांगितले.


 



'अशा विचारशून्य लोकांसमोर नाचण्याऐवजी मी डान्स बारमध्ये नाचेन, मी खूप ठोकर खाल्ल्या आणि रंग रुप सुधारण्यासाठी सर्जरीची मदत घेतली. सर्जरी रुममध्ये मी नीरू भेदा म्हणून गेली आणि सुंदर रंगरुपात राखी सावंत म्हणून बाहेर आल्याचे'तिने सांगितले.