मुंबई : भोजपुरी सिंगर शिल्पी राज नुकतीच चर्चेत आली होती. याचं कारण म्हणजे तिचा एक एमएमएस व्हिडिओ ऑनलाइन लीक झाला होता. या व्हिडिओबद्दल बोललं जात होतं की, शिल्पी राज तिच्या बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या गायिकेला खूप ट्रोल केलं आणि खूप खरं-खोटं सुनवलं. आता या संपूर्ण प्रकरणावर शिल्पीने मौन तोडत मोठा खुलासा केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी ती मुलगी मी नसल्याचं तिचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MMS मध्ये दिसणारी मुलगी मी नाही - शिल्पी
या संपूर्ण प्रकरणावर आता गायिका शिल्पी राजने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान याविषयी बोलताना गायिका म्हणाली, 'व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी कोण आहे हे मला माहीत नाही. माझी प्रतिमा खराब करण्याचा हा केवळ डाव आहे.


मला बदनाम केलं जात आहे
शिल्पी राज पुढे म्हणते, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकं माझं नाव घेत आहेत पण मला प्रश्न पडला होता की, या व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी कोण आहे. मला बदनाम करण्याचा हा कोणाचा तरी डाव आहे असं मला वाटतं. जेव्हा कोणी इंडस्ट्रीत पुढे जातो तेव्हा त्याचं यश रोखण्यासाठी लोकं त्याच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलू लागतात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मी कोर्टात केसही केली होती. माझे कुटुंबीय आणि विशेषतः माझा भाऊ यामुळे नाराज झाले. पण मी त्यांना हा सगळा प्रकार समजावून सांगितला.


शिल्पी राज पुढे म्हणाली की, मी भोजपुरी इंडस्ट्रीत चांगलं काम करत आहे. त्यामुळे मला येथे सतत काम मिळत आहे. आता मला बॉलिवूडमध्येही पदार्पण करायचं आहे. मला एक दिवस बॉलिवूडमध्ये गाणं गाण्याची इच्छा आहे.