Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' हा चित्रपट काल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. दिवाळीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप चांगली सुरुवात केली आहे. 'भूल भुलैया 3' हा चित्रपट कार्तिक आर्यनचा बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. याच दिवशी अर्थात काल अजय देवगनचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. सिंघम या फ्रॅंचायझीच्या चित्रपटासोबत क्लॅश होऊनही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, 'भूल भुलैया 3' नं पहिल्या दिवशी आगाऊ बूकिंगमध्येच 19.22 कोटींची कमाई केली आहे. तर प्रदर्शनानंतर देखील कमाईत वाढ झाली आहे. या चित्रपटानं 35.50 कोटींची कमाई केली आहे. 


'भूल भुलैया 3' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केलेली ही कमाई त्याच्या करिअरची सगळ्यात हायएस्ट ओपनर चित्रपटांपैकी एक ठरली आहे. या आधी त्याच्या कोणत्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई केली असेल तर तो चित्रपट 'भूल भुलैया 2' होता. त्याच्या 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या फ्रेंचायझीनं त्यावेळी पहिल्या दिवशी 14.11 कोटींची कमाई केली होती. 


'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' ची पहिल्या दिवसाची कमाई


'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाई विषयी बोलायचं झालं तर 'सिंघम अगेन' नं पहिल्या दिवशी 43.50 कोटींची कमाई केली. खरंतर प्रेक्षक वर्षभरापासून या चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. अशात या चित्रपटाची कमाई ही त्या तुलनेत फार कमी असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर या चित्रपटाच्या तुलनेत 'भूल भुलैया 3' नं पहिल्या दिवशी जी कमाई केली त्याची अपेक्षा कोणालाही नव्हती. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 


हेही वाचा : KBC 16: योग्य उत्तर दिलं तरी 50 लाख रुपये जिंकू शकली नाही स्पर्धक! असं का घडलं?


'भूल भुलैया 3' विषयी बोलायचं झालं तर हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया' या चित्रपटाचा सीक्वल आहे. या पहिल्या चित्रपटात अक्षय कुमार आणि विद्या बालन दिसले होते. तर 2022 मध्ये त्याचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवानी दिसले. तर आता तिसऱ्या भागात कार्तिक आर्यनसोबत तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि राजपाल यादव देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.