Kaun Banega Crorepati 16 : 'कौन बनेगा करोडपति 16' च्या नव्या एपिसोडची प्रेक्षक रोज प्रतीक्षा करत आहे. अमिताभ बच्चन हे या शोचं सुत्रसंचालन करत आहेत. तर अमिताभ बच्चन हे स्पर्धकांना विविध प्रश्न विचारत त्यांच्याशी गप्पा मारताना दिसतात. दुसरीकडे या शोमध्ये येणारा प्रत्येक स्पर्धक हा कोट्याधीश होण्याचं स्वप्न घेऊन येतो. यावेळी शोमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंडसाठी प्रश्न विचारतात, तर यावेळी अंकिता सिंग आणि समीर कुमार त्रिपाठीला एकमेकांना आव्हान देण्याची संधी मिळते. तर यावेळी अंकिता ही बाजी मारते.
हॉटसीटवर बसल्यानंतर अंकिता बोलते की ती सध्या UPSC परिक्षार्थी आहे. तिच्या स्वप्नांविषयी बोलताना अंकिता बोलते 'मी माझ्या आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले. मी डिप्रेशनमधून गेली आहे आणि मला कळलं की पैसे असणं खूप गरजेच आहे. मी एका अॅग्रीकल्चर स्टार्टअप विषयी विचार केला. मला हाइड्रोपोनिक शेती करायची होती. त्यांना मातीची गरज नाही आणि त्यात फक्त पाण्याची गरज आहे. त्याशिवाय तुम्हाला पाणी रिसायकल देखील करता येतं. तुमच्याकडे मोठं टेरेस आहे आणि तुम्ही तिथे ही शेती करू शकता.'
या सगळ्या चर्चांनंतर 50 लाख रुपयांसाठी जेव्हा अंकिताला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर योग्य उत्तर देऊनही ती 50 लाख रुपये जिंकू शकली नाही. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे तो प्रश्न? प्रवीण कुमार कोणत्या मार्शल आर्टच्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला?
A) वुशु
B) ताई ची
C) ऐकिडो
D) मुए थाई
या प्रश्नाचं उत्तर देत अंकिता म्हणाली, माझं मन असं म्हणतं की A) वुशु हे उत्तर आहे. पण 50 लाख रुपयांसाठी प्रश्न आहे. 'मला कोणती जोखीम घ्यायची नाही.' ती तिकडेच खेळ थांबवण्याचा निर्णय घेते. पण त्या आधी योग्य उत्तर काय आहे हे बिग बी तिला सांगतात आणि योग्य उत्तर हे A) वुशुचं असतं. त्यामुळे योग्य उत्तर येत असूनही अंकिता 50 लाख रुपये जिंकू शकली नाही आणि ती फक्त 25 लाख 80 हजार रुपये घेऊन घरी गेली. जर तिनं या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर ती 50 लाख रुपये जिंकू शकली असती.