Bhool Bhulaiyaa 3 Teaser : भुलभुलैया या चित्रपटानं मागच्या वर्षी एक नवा ट्रेण्ड सेट केला. 2022 साली कार्तिक आर्यन (Bhul Bhulaiyaa 2 Box office), तब्बू आणि कियारा अडवाणी यांच्या अभिनयानं गाजलेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे त्याच्या बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनकडे पाहता कार्तिक आर्यन हा सुपरस्टार ठरला होता, आता त्याचा नवा भाग प्रेक्षकांच्या (Bhool Bhulaiyya New Movie) भेटीला येतो आहे. हा चित्रपट नव्या ढंगात आणि नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येयला सज्ज झाला आहे. कार्तिक आर्यननं इन्टाग्राम पेजवरून (Kartik Aryan Fans Good News) आपल्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज दिली आहे. आपल्या इन्टाग्राम पोस्टद्वारे त्यानं आपल्या चाहत्यांसाठी 'भुलभुलैया 3' या चित्रपटाता टिझर (Bhool Bhulaiyaa 3 Teaser) शेअर केला आहे. या टीझरच्या खाली प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत. (Bhool Bhulaiyaa 3 Teaser Out actor kartik aryan is back with his new avatar releasing in 2024)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2007 साली अक्षय कुमारच्या लोकप्रिय भुलभुलैया (Akashy Kumar Bhul Bhulaiyaa) या चित्रपटानं एक वेगळ्याच हॉरर कॉमेडीची ओळख प्रेक्षकांना करून दिली होती. आपल्या आगळ्यावेगळ्या अभिनयानं त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. एकदा तर अनेकदा हा चित्रपट भारतातील काय जगातील प्रेक्षकांनी पाहिला असलेच. यंदाही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. टिव्हीवरही कधीही हा सिनेमा लागला की आपण तो आवर्जून पाहतोच पाहतो. त्यामुळे या चित्रपटाच्या या नव्या भागाविषयी आणि कार्तिकच्या नव्या लुकविषयी (Kartik Aryan New Look) पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 


काय आहे या नव्या टिझरमध्ये? 


या नव्या टीझरमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग असल्याचे जाणवते आहे. यामध्ये एका काळोख्या ठिकाणी कार्तिक आर्यन बसलेला दिसतो आहे त्याचबरोबर त्याच्या बॅकराऊंडला आमी जे तोमार हे गाणं सुरू आहे. मध्येच दरवाजा उघडतो आणि मध्येच तो बंद होतो, यात कार्तिक आर्यन म्हणतो की, तुम्हाला काय वाटलं कहाणी संपली, नाही ती अजून बाकी आहे आणि या हवेलीतल्या आत्मा काही फक्त माझ्या आतच जात नाही तर त्या सगळीकडे आहेत, असा काहीसा उल्लेख तो करताना दिसतोय. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


भुल भुलैयाची लोकप्रियता


मागच्यावेळीही 2022 मध्ये भुलभुलैयाच्या (Bhul Bhulaiyaa 2 Box Office Collection) दुसऱ्या सिझननं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत रेकॉर्ड ब्रेक केला होता.