Bhool Bhulaiyaa 3 teaser : सुरेख, समांतर, मनोरंजक आणि गुढ अशा अनेक प्रकारच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विद्या बालनला कायमच प्रेक्षक पसंती मिळाली आहे. साचेबद्ध अभिनेत्री किंवा बोल्डनेसला शह देत विद्यानं कायमच तिचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. Bhool Bhulaiyaa 3 मुळं पुन्हा एकदा विद्यानं चाहत्यांची नजर रोखली आहे. अशी ही अभिनेत्री आता चक्क तिच्या घरामुळं आणि घराविषयीच्या एका Secretमुळं चर्चेत आली आहे. हे सिक्रेट काय आहे माहितीये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्या बालन (Vidya Balan) ज्या आलिशान घरात राहते आणि तिचं जे घर पाहून अनेकांनाच हेवा वाटतो ते तिचं नाहीये. किंबहुना ती इथं भाडेतत्वावर राहते. हल्लीच विद्यानं एका कार्यक्रमादरम्यान आपण आपल्या पतीसह भाड्याच्या घरात राहतो असं स्पष्ट केलं. विद्यानं सांगितल्यानुसार लग्नानंतर ती आणि तिचा चित्रपट निर्मिती क्षेत्रात सक्रिय असणारा पती, सिद्धार्थ रॉय कपूर घर शोधण्यासाठी निघाली होती. घराच्या शोधाविषयी सांगताना विद्या म्हणाली, 'आम्ही जवळपास 25 घरं पाहिली पण, एकाही घराच्या बाबतीत आमचं एकमतच झालं नाही. शेवटी एक असं घर मिळालंच जे आम्ही दोघांना आवडलं. पण, हे घर भाडेतत्त्वावर असणारं होतं जी बाब खटकत होती.' 


प्रत्यक्षात विद्याला कधीच भाडेतत्त्वावरील घरात राहायचं नव्हतं. स्वप्नातलं हवं तसं घर शोधण्यासाठी या जोडीनं बरेच प्रयत्न केले आणि पुन्हा ते त्याच भाड्याच्या घरावर पोहोचले. जिथं त्यांनी घर भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला. इतक्या गर्दीच्या शहरामध्ये बागबगीचा आणि समुद्राचा नजारा असणारं घर मिळणं अतिशय कठिण आहे, असं म्हणत तिनं आपण नेमकं भाड्याच्या घरात का राहतो या प्रश्नाचं उत्तर स्वत:च दिलं.


हेसुद्धा पाहा :  Video : कोल्हापुरच्या कुशीतलं Offbeat कास पठार; जो इथं येतो, इथलाच होऊन जातो...


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)


मनाजोगं घर शोधणं हे नशिबानंच शक्य होतं असं विद्याचं मत. घरामध्ये प्रवेश करताच त्यात स्वत्वाची भावना जाणवते असं म्हणताना तिनं 15 वर्षांपूर्वीचा काळ आठवलला जेव्हा विद्या तिच्या आईसोबत मुंबईत घर शोधत होती. चेंबूर येथील प्रवास कमी करण्यासाठी तिनं वांद्रे किंवा जुहू इथं कामाच्याच नजीक घर शोधण्याचा प्रयत्न केला आणि काहीसं महाग पण, मनाजोगं घर विद्याला तेव्हाही मिळालं होतं. घराच्या बाबतीत विद्याला तिच्या नशिबानं कायमच साथ दिली हेच तिच्या या अनुभवातून स्पष्ट होत आहे असं म्हणायला हरकत नाही.