Bhootnath Childhood Actor: बालकलाकारांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. मोठेपणी ते कसे दिसतील याचीही जोरात चर्चा रंगलेली असते. 2008 साली एक चित्रपट आला होता. ज्याची चांगलीच चर्चा होती आणि तो चित्रपट म्हणजे भुतनाथ. या चित्रपटाची तेव्हा भलतीच क्रेझ होती. अमिताभ बच्चन आणि छोटासा मुलगा बंकू यांची ही कथा होती. बिग बींच्या अभिनयाचे जेवढे कौतुक झाले तेवढेच कौतुक झाले ते म्हणजे या छोट्याश्या बंकूचे म्हणजे अमन सिद्दीकी या अभिनेत्याचे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमन आता मोठा झाला असून सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा रंगलेली असते. किंबहूना तो आता इतका मोठा झाला आहे की त्याला ओळखणंही फार कठीण झालं आहे. त्याचा लुक आता या 15 वर्षांमध्ये फारच बदलला आहे. तो लहानपणी जितका क्यूट आणि गौंडस दिसत होता तितकाच आता तो फार हॅण्डसम आणि हॉट दिसायला लागला आहे. त्याच्या नव्या लुकची बरीच चर्चा असते. भुतनाथ या चित्रपटाचे लोकप्रियतेनुसार दोन भाग आले. परंतु त्यातला पहिला भाग हा सगळ्यांच्याच लक्षात राहिला होता.


दुसऱ्या भागात अमन सद्दीकी नव्हता. पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भागही प्रचंड गाजला होता. अमिताभ बच्चन ज्या बंगल्यात राहत होते तिथे ते आपल्या कुटुंबासह राहत होते. परंतु त्यांचा मुलगा हा त्यांना सोडून कायमचा परदेशात निघून जातो तेव्हा त्यांच्या पत्नीला फार दु:ख होते आणि त्यानंतर आपल्या मुलाला ते पुन्हा परदेशी जाण्यापासून रोखात परंतु त्या भांडणातच ते बंगल्यातील जिन्यावरून पडतात आणि मग त्यांचा अपघाती मृत्यू होतो. त्यानंतर त्यांचे भूत त्या बंगल्यात वावरत असते. 



त्यानंतर त्या घरात राहायला अमन येतो आणि त्यामुळे त्यांचा तो लहानगा मित्रच बनून जातो. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक घटना घडतात. त्यांचा मुलगाही परत येतो परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. हा पिक्चर सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणतो. आजही हा चित्रपट अनेकांच्या लक्षात आहे. सध्या या छोट्याश्या बंकूची बरीच चर्चा आहे. अमन हा बालकलाकार म्हणून बराच लोकप्रिय होता. त्याचे अनेक चित्रपटही प्रचंड लोकप्रिय आहेत. परंतु त्यानंतर तो फारसा चित्रपटांमध्ये रमला नाही. परंतु तो गायक असावा असे त्याच्या पोस्टवरून समजते कारण तो त्याच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर अनेक व्हिडीओज हे पोस्ट करत असतो.