मुंबई : भोजपुरी सिनेमाची हॉट अभिनेत्री मोनालिसा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तिच्या अंदाजावर चाहते फिदा आहेत. नुकतीच  मोनालिसा तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. ज्यावर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत मोनालिसाने पुन्हा एकदा अतिशय ग्लॅमरस शैलीत फोटोशूट केले आहे. ज्यात तिचे सौंदर्य दिसत आहे. मोनालिसाने ब्लू कलरचा गाऊन घालून हे फोटोशूट केले. ज्यात तिचा वेस्टन लूक पाहायला मिळत आहे.


मोनालिसाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोशूटची अनेक फोटो शेअर केले आहेत. मोनालिसाचा हा अवतार सगळ्याचं लक्षवेधून घेत आहे. 



नुकत्याच एका मुलाखतीत ट्रोल्सबद्दल बोलताना मोनालिसा म्हणाली की, " लोकांनी मला खूप ट्रोल केले आहे. जरी गेल्या काही काळात ते कमी झाले असले तरी सुरुवातीला लोक माझ्याबद्दल खूप नकारात्मक गोष्टी लिहायचे. बॉडी शॅमिंगपासून ते इंग्रजी बोलता न येण्यापर्यंत, तिला ट्रोल करण्यात आले आहे. पण नंतर मी त्या सर्वांकडे दुर्लक्ष करणे चांगले मानले."