Bhumi Pednekar faced sexual assault : 2015 मध्ये 'दम लगा के हईशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री भूमि पेडनेकरनं सगळ्यांची मने जिंकली. भूमिनं तिच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपलं स्थान मिळवलं. गेल्या काही दिवसांपासून भक्षक या आगामी चित्रपटाच्या चर्चांमुळे ती चर्चेत होती. तर या सगळ्यात भूमि आता एक दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. वयाच्या 14 व्या वर्षी मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या जत्रे दरम्यान, तिचे छेडछाड करण्यात आली होती. त्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसला होता. याचा खुलासा भूमिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Hauterrfly ला दिलेल्या मुलाखतीत भूमि पेडनेकरनं सांगितलं की ती 14 वर्षांची होती तेव्हा तिच्यावर अत्याचार झाला होता. तिनं सांगितलं की ती अजूनही त्यातून बाहेर आलेली नाही. भूमिनं सांगितलं की 'मला अजुनही स्पष्टपणे ते आठवतंय. वांद्रेत तेव्हा एक जत्रा भरली होती. मी तेव्हा 14 वर्षांची होती आणि त्या जत्रेत मी माझ्या कुटुंबासोबत गेली होती. मला माहित होतं की काय होतंय... असं नव्हतं की मला कळत नव्हतं. मी चालत होती आणि कोणी मागून मला चिमटे काढत होतं. मी मागे वळून पाहिलं, पण मला कळलं नाही की हे नक्की कोणी केलं.. कारण तिथे खूप गर्दी होती. कोणीतरी मला सतत चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होतं आणि मी घाबरली होती. महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी मी माझ्या कुटुंबासोबत होते तरी देखील. तिथे माझ्या बिल्डिंगमधील अनेक मुलं होती, मात्र, त्यावेळी मी काहीचं बोलले नाही. त्याचं कारण म्हणजे त्यावेळी मला खूप मोठा धक्का बसला होता.'



हेही वाचा : 'आता माझ्यात ताकद नाही...', काम मिळत नसल्यानं 'बागबान' मधील अभिनेत्यानं व्यक्त केली खंत


दरम्यान, भूमिच्या पेडनेकरच्या कामा विषयी बोलायचे झाले तर ती सगळ्यात शेवटी 'थॅन्कू यू फॉर कमिंग' या चित्रपटात दिसली होती. दुसरीकडे तिच्या आगामी चित्रपट 'भक्षक' विषयी बोलायचे झाले तर, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटात अभिनेता संजय मिश्रा यांची महत्त्वाची भूमिका आहे. तर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील या चित्रपट महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.