'आता माझ्यात ताकद नाही...', काम मिळत नसल्यानं 'बागबान' मधील अभिनेत्यानं व्यक्त केली खंत

Nassir Khan : नासिर खाननं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत कास्टिंग दिग्दर्शकांकडे केली कामा देण्याची विनंती. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 4, 2024, 12:18 PM IST
'आता माझ्यात ताकद नाही...', काम मिळत नसल्यानं 'बागबान' मधील अभिनेत्यानं व्यक्त केली खंत title=
(Photo Credit : Social Media)

Nassir Khan : 'बागबान' हा चित्रपट कोणाच्या लक्षात नाही. मुलं मोठी झाली की त्यांचं आणि आई-वडिलांचं आयुष्य कसं बदलतं, हे आपल्याला त्याता पाहायला मिळालं. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या चित्रपटात दिसलेला अभिनेता नासिर खान तुमच्या लक्षात आहे? त्यानं यात अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारली असून चित्रपटात त्याचं नाव करण मल्होत्रा होतं. मात्र, या चित्रपटानंतर तो जसा चित्रपटसृष्टीपासून दुरावला. एका मोठ्या कलाकाराचा मुलगा असूनही त्याला चित्रपट मिळाले नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्याचे वडील कोण होते? तर त्यांच्या मुलाचे नाव जॉनी वॉकर आहे. जॉनी वॉकर हे लेजेंडरी कलाकार आहेत. जॉनी वॉकर यांचा मुलगा असूनही नासिरला कोणाकडूनही मदत मिळाली नाही. तर तो त्याच्या हिंमत्तीवर काम करत राहिला. आता नासिरवर अशी परिस्थिती आली आहे की त्यानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत कास्टिंग डायरेक्टर्सकडे काम मागत होते. 

हा व्हिडीओ नासिर खाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नासिर खाननं त्याचं नाव, वय आणि उंची सांगितली. त्यानंतर कास्टिंग डायरेक्टर्सशी आधी विनंती केली की जर त्यांच्याकडे कोणता प्रोजेक्ट असेल आणि त्यांना वाटत असेल की नासिर एखादी भूमिका करू शकतो. तर कॉल किंवा मेसेज करा. पण त्यासोबत नासिरनं हे देखील सांगितलं की तो आता ऑडिशन देऊ शकणार नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : चालू रीलमध्ये जिनिलियानं रितेशला मारलं!

या व्हिडीओ कास्टिंग डायरेक्टर्स आणि त्यांच्या असिस्टंट्सना विनंती करत सांगितले की 'माझं नाव नासिर खान, माझं वय 55 वर्षे आहे आणि माझी उंची ही 5.9 फूट आहे. मला सगळ्या कास्टिंग डायरेक्टर आणि त्यांच्या असिस्टंट्सना सांगायचं आहे की मी अनेक अॅड फिल्म्स, टिव्ही, वेब सीरिज आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तुम्ही मला पाहिलं असेल. जर तुम्हाला वाटत असेल की मी योग्य अभिनेता आहे, तर कृपया मला कॉल किंवा मेसेज करा. मला तुमच्या सगळ्यांसोबत काम करायचे आहे. मात्र, आता ऑडिशन देण्याची ताकद आणि हिंम्मत माझ्यात नाही. कृपया आता ऑडिशन देण्याची ताकद आणि हिंमत्त माझ्यात नाही आहे. मी नाही ऑडिशन देऊ शकतो आणि त्या भूमिकेसाठी मी योग्य अभिनेता आहे, हे सिद्ध करण्यासाठी मला ऑडिशन देखील द्यायचे नाही. जर तुम्हाला वाटतं की मी कोणत्याही भूमिकेसाठी योग्य आहे, तर कृपया मला कॉल किंवा मेसेज करा. मी काम करण्यासाठी तयार आहे. पण ऑडिशन देण्यासाठी नाही.' 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x