मुंबई : युवा बॉलिवूड स्टार भूमी पेडणेकरने पर्यावरणाव जागतिक स्तरावर जनजागृती करत आहे. तिने ऑस्ट्रेलियात हवामान बदलाचा मुद्दा उपस्थित केला आणि जगभरातील लोकांना अत्यंत वाइट अवस्थेच्या उंबरठ्यावर असल्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच भूमी मेलबर्नमध्ये गेली होती. जिथे तिने पृथ्वीचं संरक्षण करण्याच्या गरजेबद्दल प्रेक्षकांना संबोधित केलं आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली, ''आम्ही जसं बोलतो की, तसं हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जात आहोत, आमची पिढी, प्रत्येकजण, आम्ही सर्वजण त्याचा सामना करणार आहोत आणि हे असंबही काही नाहीये जे केवळ काही वर्गांवर परिणाम करतात, निसर्गाच्या कोपाच्या समोर आपण सर्वजण समान आहोत."


ती पुढे म्हणाली, ''काही वर्षांपूर्वी मी आणि माझे सहकारी कुठेतरी जात होतो आणि आम्ही काय बोलणार असं मला वाटलं कारण आम्ही एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला भेटणार होतो. मला असं वाटतं की हवामान बदल ही एक गोष्ट आहे ज्याबद्दल बोलणं खूप आवश्यक आहे. मात्र त्यावेळी कोणीही याबद्दल बोललं नाही, की आपण संकटात आहोत, आपण आपत्कालीन स्थितीत आहोत आणि हवामान बदल हा मानवतेला आजवरचा सर्वात मोठा धोका आहे.''


ऑस्ट्रेलियामध्ये, मी चुकीची असल्यास मला सांगा माझ्या चुका, सुमारे दोन वर्षांपूर्वी जंगलात लागलेली आग खूप वाईट होती. निसर्गामध्ये सध्या जे काही घडत आहे ते हृदयद्रावक आहे, आपण ज्या वेडेपणाला सामोरे जात आहोत - आपण मानवी जीवन आणि प्राणी गमावत आहोत. भारत नुकताच पाण्याखाली गेला आहे. आपल्या देशाची राजधानी दिल्ली शहराने ज्या प्रकारचा पावसाळा पाहिला त्या प्रकारची सवय नाही, सध्या उन्हाळा शिगेला पोहोचणार होता पण पाऊस पडत आहे. भारतात सर्वत्र पूर आला आहे.


भूमी पुढे म्हणाली,  लोकांनी हवामान बदलाबाबत तातडीने पाउले उचलण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आपल्याला हवामान बदलाबद्दल बोलण्यासाठी या ठिकाणी खूप लोकांची आवश्यकता आहे कारण आपण आपत्कालीन स्थितीत आहोत. WHO आणि UN ने अलीकडेच म्हटलं आहे की पृथ्वी संकटात आहे,  भावी पिढ्यांसाठी ही आपली जबाबदारी आहे.' वर्क फ्रंटवर बोलायचं झालं तर, भूमीचा आगमी चित्रपट थँक यू फॉर कमिंगमध्ये 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.