मुंबई : 'सांड की आँख', 'पती पत्नी और वो' अशा एकापेक्षा एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात अलेली अभीनेत्री भूमी पेडणेकर सध्या समुद्रामध्ये मज्जा करताना दिसत आहे. समुद्रात मनसोक्त आनंद लुटताना तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिच्या या पोस्टमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. भूमी नव्या वर्षी आपले सर्व स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामधील समुद्रात मनसोक्त आनंद लुटण्याचं तिचं पूर्ण झालं आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शमध्ये, 'जीवन हे फक्त सुंदर क्षणांचं गाठोडं आहे. मागील दशक मला फार काही देवून गेलंयं. गेल्या वर्षांमध्ये आलेल्या अनुभवामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढला असल्याचे तिचे म्हणणे आहे.



 
शिवाय या आत्मविश्वासामुळे मला अजून संधी मिळतील जेणे करून मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग करू शकेलं. तसेच मझ्या कुटुंबाकडून नेहमी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे सांगत मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझं जीवन स्वच्छंदीपणे जगत असल्याचं तिने म्हटले आहे. 


नववर्षाच्या पहिल्याचं दिवशी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या भूमीच्या या व्हिडिओने चाहत्यांची झोप उडवली आहे. तिचा हा बिकनीतील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.  ती नुकताच 'पती पत्नी और वो' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. 


या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता २०२०मध्ये भूमी कोणत्या चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येईन हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.