मुंबई :  'रक्षाबंधन', 'बधाई हो', 'पती पत्ना और वो' अशा अनेक एकापेक्षा एक सिनेमातून अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. भूमी फक्त तिच्या अभिनयानेच नाही, तर फोटो आणि व्हिडीओमुळे देखील चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीच्या फोटोंची सर्वत्र चर्चा रंगत आहे. नव्या फोटो आणि व्हिडिओमुळे भूमी सोशल मीडियावर (Bhumi Pednekar social media) चर्चेत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूमी पेडणेकर शेवटची 'गोविंदा मेरा नाम' या चित्रपटात विकी कौशल आणि कियारा अडवाणीसोबत दिसली होती. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता लवकरच चाहत्यांना भूमी राजकुमार रावसोबत 'भीड'मध्ये आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'अफवाह' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. या दोन चित्रपटांशिवाय भूमीकडे 'द लेडी किलर' आणि 'मेरे हसबंड की बीवी' सारखे चित्रपट देखील आहेत.


बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. भूमीचा प्रत्येक व्हिडिओ आणि फोटोमध्ये वेगळा लूक आणि स्टाइल पाहायला मिळत होती. मात्र, काही लोकांना तिचा लूक खूप आवडला तर काही लोकांनी अभिनेत्रीला ट्रोल देखील केलं. त्याचबरोबर, एका व्हिडिओमध्ये, भूमी  खूप छोटा ड्रेस परिधान करून स्विंगवर बसलेली दिसत आहे, ज्यामुळे ती ऊप्स मोमेंटची शिकार झाली होती.



भूमी पेडणेकरने तिच्या हॉट लुकने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं. कधी बिकिनी, कधी मोनोकिनी तर कधी शॉर्ट ड्रेसेसमध्ये या अभिनेत्रीने चाहत्यांना वेड लावलं. भूमी यावेळी ऊप्स मोमेंटची शिकारही झाली. व्हिडिओमध्ये तिची पाठ दिसत आहे आणि ती बिकिनी घालून समुद्राच्या लाटांचा आनंद लुटताना दिसत आहे. याशिवाय आणखी एका व्हिडिओमध्ये भूमी शॉर्ट ड्रेसमध्ये झोपाळ्यावर बसलेली दिसली होती, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत होती.