भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे एकत्र; पाहा व्हिडीओ
`ऊन सावली` या चित्रपटात प्रणय आणि आन्वीची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. `एक अरेन्ज मॅरेज ही अद्भुत लव्हस्टोरी असू शकते` ह्या वाक्यात `ऊन सावलीचे` गूढ लपलेलं आहे.
मुंबई : सध्या अनेक मराठी सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. तर काही सिनेमांची नुकतीच घोषणा झाली आहे. याच यादितला ऊन सावली हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे स्टारर चित्रपट ‘ऊन सावली’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज़ करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीजर आणि गाण्यांना खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेलर रिलीज होताच लोकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं आहे .
'ऊन सावली' या चित्रपटात प्रणय आणि आन्वीची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. 'एक अरेन्ज मॅरेज ही अद्भुत लव्हस्टोरी असू शकते' ह्या वाक्यात 'ऊन सावलीचे' गूढ लपलेलं आहे. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहणारं हे सुंदर जोडपं बरच काही सांगू पाहत आहे, बरच काही बोलू इच्छित आहेत. पहिल्या भेटीतच प्रणयला आन्वी आवडते. परंतु आन्वीचा विरोध हा कायम आहे. तिच्या मनात तर वेगळाच गोंधळ चालू आहे. हे आगळं वेगळं प्रेम पाहण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये तर जावंच लागेल. हा चित्रपट लग्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःशी जोडणारा आहे.
तिकीट विंडो पिक्चर्स बॅनर अंतर्गत समीर ए शेख द्वारा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे . तसेच निर्देशन दिवाकर नाईक यांनी केले आहे. चित्रपटा मध्ये म्युजिक सार्थक नकुल यांनी संगीतबद्ध केले आहे. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे हे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तसेच अजिंक्य ननावरे, राज सरनागत, अंकिता भोईर, विकास हांडे, श्वेता कामत, प्रिया तुळजापूरकर आणि मनाली निकम ह्याचा देखील समावेश आहे.
हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिले गाणे एवढे हिट झाले आहे की चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टीजर पाहिल्यावर नक्कीच ह्या दोघांमधील ऊन सावलीचा खेळ पाहण्याची लगबग प्रेक्षकां मध्ये पाहायला मिळणार आहे. 'एक अरेन्ज मॅरेज ही अद्भुत लव स्टोरी असू शकते' ह्या वाक्यात 'ऊन सावलीचे' गूढ लपलेले आहे. प्रेक्षकांसाठी प्रेमाचा आगळा वेगळा आनंददेणारा, हळुवार स्पर्श करणारा असा हा चित्रपट आहे. आज ह्या चित्रपटाचे पोस्टर आणि टीजर जाहीर करण्यात आले. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहणारे हे सुंदर जोडपं बरच काही सांगू पाहत आहे, बरच काही बोलू इच्छित आहेत.