मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक रॉयल गाड्यांचं कलेक्शन आहे. त्यांच्या मैल्यवान गाड्यांमध्ये आता आणखी एका गाडीची भर पडली आहे. बिग बींनी त्यांच्या नव्या गाडीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये ते फोर्डच्या विंटेज कारसोबत उभे राहिलेले दिसत आहे. त्यांना ही कार मित्र आनंतने भेट म्हणून दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बींनी यामागील इतिहास त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाहीर केला आहे. ट्विटरवर फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'आयुष्यात असे काही क्षण येतात तेव्हा ते व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे शब्द देखील नसतात. सध्या मी माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. पण माझ्यासाठी ते फार कठीण आहे.' 



महत्त्वाचं म्हणजे बिग बींच्या पहिल्या गाडीचा जो नंबर होता तोच नंबर या नव्या कारचा देखील आहे. उत्तर प्रदेशचं रजिस्ट्रेशन असलेल्या गाडीचा नंबर २८८२ असा आहे. ट्विटरवर एक भावूक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. 


दरम्यान, अमिताभ बच्चन लवकरच दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्या 'झुंड' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ८ मे २०२० रोजी 'झुंड' रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे ते 'गुलाबो सिताबो' चित्रपटात देखील भूमिका साकारताना दिसणार आहेत. 


त्यानंतर अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात ते झळकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं आहे. त्यामुळे येत्या काळात बिग बी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करतील हे नक्कीच.