मुंबई : कलाजगतामध्ये काही नावं आणि चेहऱ्यांसमवेत प्रसिद्धी आणि चर्चा ओघाओघानं येतात. त्यातलंच एक नाव म्हणजे अमिताभ बच्चन यांचं. महानाय अशी ओळख असणाऱ्या या अभिनेत्याचा सर्वांनाच हेवा वाटतो. एक कलाकार म्हणून आपली प्रतिष्ठा जपतानाच एक व्यक्ती म्हणून ते आपलं समाजभान कधीही विसरलेले नाहीत. (Amitabh bachchan Bollywood)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा या अमिताभ बच्चन यांच्याकडून एक अशी गोष्ट घडली, ज्यामुळं प्रसिद्ध अभिनेत्याला आपण अनाथ असल्यासारखं वाटू लागलं... विश्वास बसत नाहीये का तुमचा?


असं म्हटलंय अभिनेता अर्शद वारसी यानं. 1996 मध्ये 'तेरे मेरे सपने' या चित्रपटातून अर्शदनं हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. 


पहिल्या चित्रपटानंतर तो अचानकच दिसेनासा झाला. यानंतर तो 'मुन्नाभाई एमबीबीएस'मधून सर्किटच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. 


हल्लीच एका मुलाखतीत त्यानं आपल्या 'गॉडफादर'च्या नावाचाही खुलासा केला. अमिताभ बच्चन हे आपले गॉडफऱादर असल्याचं तो म्हणाला. कारण, त्यांच्या ABCL या कंपनीनं त्याला पहिला ब्रेक दिला होता. 


आपण या कंपनीपासून करियर सुरु केल्याचं म्हणत त्यानं पहिल्या चित्रपट दिग्दर्शकाचं नावही घेतलं. पण, त्यानंतर मात्र आपल्याला त्यांनी (बच्चन यांनी) अनाथाप्रमाणे सोडल्याचं म्हटलं. 


मला त्यांनी अनाथांप्रमाणे सोडल्यामुळे आता गॉडफादर म्हणू की आणखी काही , मलाच ठाऊक नाही... असं वक्तव्य त्यानं केलं. 


खरंच बिग बींच्या कंपनीनं पुन्हा अर्शदला संधी का दिली नाही, खरंच त्याच्याकडे पाठ फिरवली गेली होती का हे प्रश्न त्याच्या या वक्तव्यामुळं अनुत्तरित राहिले.