मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि आमिर खान हे दोन दिग्गज अभिनेते लवकरच एकत्र दिसणार आहेत. अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांना एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. 'ठग्स ऑफ हिंदोस्तानचे निर्माता विजय कृष्ण आचार्य हे सिनेमाचे मोठे-मोठे सेट आणि अनोख्या शॉट्ससाठी चर्चेत असतात. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये पहिल्यांदा अमिताभ बच्चन आणि आमिर खान सोबत काम करणार आहेत. यशराज फिल्मच्या बॅनर खाली बनत असलेल्या या सिनेमाला या वर्षातील सर्वोत्तम सिनेमा बनवण्याचा प्रयत्न आहे. सिनेमातील प्रत्येक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कॅटरिना कैफ आणि दंगल सिनेमात काम कलेले अभिनेत्री फातिमा सना शेख देखील या सिनेमात मुख्यम भूमिकेत आहेत.


2 मोठ्या जहाजांचा वापर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये 2 मोठ्य़ा जहाजांचा वापर होणार आहे. यासाठी दोन मोठी जहाज तयार केली जात आहेत. या जहाजांचं वजन जवळपास 2 लाख किलो आहे. हे जहाज तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय डिजाइनर्सची मदत घेतली जात आहे. 1000 हून अधिक कामगार यासाठी कामाला लागले आहेत. हा या वर्षातील सर्वात मोठा सिनेमा ठरु शकतो.


बिग बजेट सिनेमा


भारतीय सिनेमातील हा सर्वात मोठा बजेटचा सिनेमा ठरु शकतो. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाचा बजेट 250 कोटी पेक्षा अधिक असल्याची चर्चा आहे. सिनेमाचं दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करत आहेत. विजय कृष्ण आचार्य यांनी आमिरसोबत 'धूम 3' हा सिनेमा देखील केला आहे. हा सिनेमा समुद्रातील लुटारुंच्या कथेवर आधारीत आहे. सिनेमाच्या शूटिंगसाठी सिनेमाची टीम 45 दिवस आइसलँडमध्ये राहणार आहे. या दरम्यान तेथे वेगवेगळ्या जागेवर शूटींग केलं जाणार आहे.